देश

दिल्लीला जाणाऱ्या विमानातील प्रवाशाच्या मोबाईलला लागली आग अन्..

विमान वाहतूक नियामक DGCA च्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

सकाळ डिजिटल टीम

इंडिगोच्या दिब्रुगड-दिल्ली विमानाच्या उड्डाणदरम्यान एका प्रवाशाच्या मोबाईलला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांची तांराबळ उडाली आहे. मात्र काही काळातच अग्निशामक यंत्रांच्या मदतीने ती आग आटोक्यात आणण्यात आली. विमान वाहतूक नियामक DGCA च्या अधिकाऱ्यांनीही माहिती दिली. दरम्यान, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला किंवा आग विझवण्यास मदत करण्याला व्यक्तीला दुखापत झालेली नाही.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीप्रमाणे, फ्लाइट क्रमांक (6E 2037) दिब्रुगढहून दिल्लीला जात होती. प्रवासादरम्यान, एका कर्मचाऱ्याला प्रवाशाच्या फोनमधून स्पार्क आणि धूर येत असल्याचे दिसले. यावेळी विमानातील अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग विझवण्यात आली. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे. इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, दिब्रुगढ ते दिल्ली या फ्लाइट (6E 2037) मध्ये मोबाईलमधून धूर निघत असल्याची घटना घडली. क्रूला धोकादायक घटनांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांनी परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणल्यामुळे विमानातील कोणत्याही प्रवाशाचे किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mumbai: मुंबईतील हवा ‘भीषण’ स्तरावर; बांधकामांना आठवडाभर स्थगितीची मागणी; पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT