Arvind Kejriwal, Narendra Modi  
देश

पोलिसांनी सरकारी कार्यक्रमाचे बॅनर काढून मोदींच्या फोटोचे बॅनर लावले; 'आप'चा आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - दिल्लीचे केजरीवाल सरकार आणि एलजी यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. दिल्ली सरकारच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे पोस्टर जबरदस्तीने लावले जात असल्याचा आरोप केजरीवाल सरकारने केला आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी कार्यक्रमापूर्वी केजरीवाल यांचे फोटो काढून पीएम मोदींचे पोस्टर लावले. तसेच मोदींचे बॅनर काढल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने करण्यात आले आहे. (AAP And Narendra Modi news in Marathi)

दिल्ली सरकारच्या वतीने 'वन महोत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये सीएम केजरीवाल आणि एलजी दोघे उपस्थित राहणार होते.

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले, 'आम्हाला भांडण नकोय. मात्र सरकारी कार्यक्रमाला राजकीय बनवण्यात आले. त्यामुळे मी आणि मुख्यमंत्री दोघेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. दिल्ली सरकारच्या अधिकृत कार्यक्रमात शनिवारी रात्री पोलिसांना पाठवण्यात आले. पीएमओच्या सूचनेनुसार हे पोलिस पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी मंचाचा ताबा घेतला आणि कार्यक्रमाच्या बॅनरऐवजी पीएम मोदींचा फोटो असलेला बॅनर लावला आणि तो हटवल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले.

11 जुलैपासून दिल्लीत वन महोत्सव सुरू होता, त्याअंतर्गत दिल्लीत वृक्षारोपण करण्यात येत होते. आज वनमहोत्सवाची सांगता होती. यानिमित्ताने असोला भाटी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी एलजी आणि मुख्यमंत्री केजरीवाल उपस्थित राहणार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT