manish sisodia  Manish Sisodia, CBI News
देश

Delhi Excise Policy Case : मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच, कोठडीत १४ दिवसांची वाढ!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मनीष सिसोदिया यांना कोर्टात हजर केले होते.

सीबीआयने मनीष सिसोदिया यांची पाच दिवसांची कोठडी न्यायालयात मागितली होती. दरम्यान न्यायालयाने सिसोदिया यांना पाच दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली होती.

दिल्लीमध्ये उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच काही दारु उत्पादकांसाठी नियमावली 'लीक' करुन देण्यात आली, असा आरोप सिसोदिया यांच्यावर आहे. या प्रकरणी दारु उत्पादकांकडून शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

दरम्यान आता मनीष सिसोदिया ३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत. सिसोदिया सध्या ईडीच्या कोठडीत असून त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआय प्रकरणातील न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर व्हीसीमार्फत न्यायालयात हजर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT