manish sisodia cbi interrogation ends related to delhi excise scam  Manish Sisodia, CBI News
देश

Manish Sisodia : सिसोदिया यांना कुविख्यात गुंडासोबत शेअर करावी लागणार सेल; २० मार्चपर्यंत कोठडी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी अटक करण्यात आलेले मनीष सिसोदिया यांची सीबीआयनंतर आता अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. तिहार एक नंबरच्या तुरुंगातील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये सिसोदियांना ठेवण्यात आलं आह. मात्र येत्या काही दिवसांत सिसोदिया यांना ही सेल इतर आरोपींसोबत शेअर करावी लागू शकते.

याबाबत अधिकाऱ्यांनीच माहिती दिली आहे. सिसोदिया सध्या ज्येष्ठ नागरिकांच्या सेलमध्ये असून तिथे सीसीटीव्ही आहेत. याच सेलच्या शेजारी काही कुख्यात गुंड आहेत. केजरीवाल सरकारमधील सत्येंद्र जैन याच वॉर्डमध्ये ७ क्रमांच्या सेलमध्ये आहे.

सोमवारी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना १४ दिवसांची म्हणजे २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्या जामीन अर्जावर १० मार्च रोजी न्यायालय निर्णय देणार आहे.

आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना सोमवारी दुपारी तिहार तुरुंगात नेण्यात आले. तेथे काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. सोमवारी दुपारी तिहार तुरुंगात पोहोचल्यानंतर सिसोदिया यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यांचा अहवाल नॉर्मल आला. यात टूथपेस्ट, टूथब्रश, साबण आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT