Farmer Agitation Sakal
देश

दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन संपलं, तंबू काढायला सुरुवात

सुधीर काकडे

दिल्लीतून मोठी बातमी येत आहे. मागील 378 दिवसांपासून सुरू असणारं शेतकरी आंदोलन(farmer protest) मागे घेत असल्याची घोषणा झाली आहे. सध्या दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी त्यांचे तंबू, घरं हटवण्याच्या तयारीत लागले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर ही मोठी घोषणा झाली आहे. अद्याप संयुक्त किसान मोर्चाने (Sanyukt Kisan Morcha) याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र शेतकऱ्यांनी आंदोलन गुंडाळत असल्याची माहिती दिली.

दिल्लीच्या सीमेवर(Simghu Border) 378 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन शेतकऱ्यांनी आता मागे घेतलं आहे. केंद्र सरकारकडून याबाबत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पत्र दिलं आहे. यामध्ये केंद्राने शेतकऱ्यांच्या पूर्ण केलेल्या मागण्यांबाबत माहिती देण्यात आली आहे. एमएसपी(MSP) आणि आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील अशी माहिती केंद्राने या पत्रातून दिली आहे.

MSP वर केंद्राची समिती

एमएसपीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्र्यांनी समिती नेमण्याची घोषणा केली आहे. या समितीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असणार आहेत. देशातील शेतकऱ्यांना एमएसपी कशापद्धतीने मिळेल हे यामध्ये निश्चित केलं जाईल. सरकारने चर्चेवेळी आधीच याबाबत आश्वासन दिलं आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यान, दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबबत केंद्र सरकारने म्हटलं की, युपी, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा सरकारने हे गुन्हे मागे घेण्यात येतील हे स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT