Sandip Patil 
देश

Farmers Protest: "सरकारविरोधात असंतोषासाठी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात माओवादी सक्रीय"; IG संदीप पाटील यांची माहिती

महाराष्ट्रातील बारसू आणि आरेच्या आंदोलनातही माओवाद्यांचा सहभाग असल्याचा दावाही संदीप पाटील यांनी केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीजवळ सुरु असलेल्या सध्याच्या शेतकरी आंदोलनात माओवादी संघटना सक्रीय असल्याची खळबळजनक माहिती महाराष्ट्र नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस महासंचालक संदीप पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील बारसू रिफायनरी प्रकल्प तसेच आरेमधील आंदोलनातही त्यांचा सहभाग होता, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. (delhi farmers protest maoist active for discontent against government says naxal virodhi abhiyaan ig sandeep patil)

लोकसभा निवडणुकीसाठी टार्गेट

संदीप पाटील म्हणाले, "येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सरकारविरोधात सूर कसा निर्माण होईल. तसेच शासनाला कसं बदनाम करता येईल यासाठी आपण अशी मोठी आंदोलनं सुरु करायची आहेत. ज्यामुळं शासन अडचणीत येईल, काही ठिकाणी हिंसा होईल आणि लोक कसे शासनाविरोधात जातील, अशी माओवाद्यांमध्ये चर्चा आहे. त्यांचा लोकशाहीवर आणि संविधानावर विश्वास नाही" (Latest Marathi News)

आंदोलनासाठी भूमिगत नेटवर्क कार्यरत

गेल्यावेळी शेतकरी आंदोलनाला यश आलं होतं त्यानंतर सध्याच्या आंदोलनासाठी देखील त्यांचं भूमिगत नेटवर्क काम करत होतं. माओवादी नेते या आंदोलनाचं नेतृत्व करणार असल्याचं त्यांच्या चौकशीतून समोर आलं आहे. गेल्यावेळी संयुक्त किमान मोर्चाचे जे मुख्य नेते होते त्यांना आत्ताच सीपीआय माओवादी पक्षातून मोठं पत्रक काढत त्यांची हाकालपट्टी करण्यात आली.

या पत्रात लिहिलं होतं की, ते आमचे सेन्ट्रल कमिटी मेंबर होते, त्यांनी गेल्यावेळच्या शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. पंजाब, हरयाणा आणि उत्तरेतील भागातील किसान मोर्चाचे माओवादी संघटनेचं नेटवर्क आहे, असं त्यांच्याकडील कागदपत्रांवरुन समोर आलं आहे, असंही संदीप पाटील यांनी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

बारसू, आरेच्या आंदोलनातही सहभाग

दरम्यान, माओवाद्यांचं मोडस ऑपरेंडी हीच आहे की मोठ्या प्रमाणावर हिंसा करायची त्यानतंर सरकार त्यांच्यावर कडक कारवाई करत, त्यानंतर ते सरकारपासून दूर जातात. त्यानंतर या लोकांना आपण कशा पद्धतीनं आपल्या माओवादी विचारसरणीकडं घेऊ शकतो, अशा पद्धतीनं ते काम करतात. (Latest Maharashtra News)

आपल्याकडं बारसू रिफानरीचं आंदोलन आणि आरे आंदोलनातही ते होते, अशा प्रकारे कुठेही जनअसंतोष दिसला तर त्याला कसं वाढवायचं आणि आपलं हित साधायचं हे ते करतातच असंही संदीप पाटील यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT