Delhi Flood Sakal
देश

Delhi Flood : भाजपने षडयंत्र रचून दिल्ली बुडवली? 'आप'चा आरोप; Video पाहून धक्का बसेल

भाजपने आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी दिल्लीत ठरवून पूर आणण्याचा कट रचला असा आरोप आपने केला आहे.

दत्ता लवांडे

दिल्ली : उत्तर भारतात पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी पुरामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. दिल्लीतील यमुना नदीला पूर आला आहे. तेथील सत्ताधारी असलेल्या आप या पक्षाने या पुरामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ आपच्या अधिकृत ट्वीटरवरून शेअर करण्यात आला आहे.

शेअर केलेला व्हिडिओ यमुना नदीवरील हथनीकुंड बॅरेज येथील आहे. या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी मोठा बंधारा बांधण्यात आलेला आहे. हे ठिकाण हरियाणा उत्तरप्रदेशच्या सीमेवर असून यमुना नदीने उत्तराखंडची सीमा ओलांडल्यानंतर काही अंतरावर हे बॅरेज आहे. तर यमुनेच्या पाणलोट क्षेत्रामध्ये साठलेले पाणी या बॅरेजमधून यमुना नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, आपने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, "या बंधाऱ्यातून एक कॅनॉल उत्तरप्रदेशच्या बाजूने जातो. पण दिल्लीत पूर आलेला असतानाही या कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात येत नाही. तर यमुनेच्या पात्रातच पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीच्या पुरामध्ये वाढ होत आहे. तर या कॅनॉलमध्ये पाणी सोडलं तर पुराचं पाणी कमी होऊ शकतं" असं हा तरूण या व्हिडिओमध्ये सांगत आहे.

"दिल्लीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपकडून हे कारस्थान केले जात आहे का? भाजपने षडयंत्र रचून दिल्लीला बुडवलं का? या प्रश्नाचं उत्तर हा व्हिडिओ पाहून मिळेलं. उत्तरप्रदेशकडे जाणारा कॅनॉल कोरडा असताना भाजपने सगळं पाणी दिल्लीकडे सोडलं आहे. दिल्लीकरांच्या तिरस्कारात भाजपा आंधळी झाली आहे." असा गंभीर आरोप आपने भाजपवर केला आहे.

हरियाणा आणि उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यामध्ये भाजपाची सत्ता आहे. दिल्लीतील अनेक नागरिक पुराच्या पाण्यामुळे त्रस्त असताना यमुनेचे पाणी सोडण्यावरील भाजपच्या या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

SCROLL FOR NEXT