Delhi crime  esakal
देश

Delhi crime :''आई मी रात्री १० वाजेपर्यंत घरी येते'',मृत्यू झालेल्या तरुणीचे शब्द ठरले अखेरचे

मद्यधुंद तरूणांनी कामाहून परतणाऱ्या तरुणीला ८ किमी नेलं फरपटत

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली येथे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री अपघातानंतर एका वाहनाखाली अडकलेल्या तरुणीला 7-8 किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.दरम्यान या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. तसेच त्याच्या अंगावरून सर्व कपडे फाडले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीच्या आईने अद्यापही आपल्या मुलीचा मृतदेह पाहिलेला नाही. माध्यमांशी बोलताना तिच्या आईने दोघींमधील अखेरचे संभाषण काय घडलं हे हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. (Delhi Girl Drag Case mother reaction She Will Be Back Home By 10 pm )

दिल्लीतील सुलतानपुरी परिसरात कारने धडक देत फरफटत नेल्याने २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे ४ वाजता रस्त्यावर नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला. मुलीच्या मृत्यूनंतर आईने माध्यामांना प्रतिक्रिया दिली.

आई मी रात्री १० वाजेपर्यंत घरी येते.....

माझ्यासाठी माझी मुलगीच सर्व काही होती. काल ती कामावर गेली होती. संध्याकाळी ५.३० वाजता तिने घर सोडलं होतं. रात्री १० पर्यंत घरी येईन असं सांगून ती गेली होती.

मला तिच्या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. पण मी अद्याप तिचा मृतदेह पाहिलेला नाही. अशी माहितीही तिच्या आईने दिली. भावंडांमध्ये सर्वात मोठी असणाऱ्या तरुणीवर कुटुंबाची जबाबदारी होती. तिच्या मागे आई, चार बहिणी आणि दोन भाऊ असं कुटुंब आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालं होतं.

कांझावाला येथील जोंटी गावाजवळ गाडीखाली मुलीचा मृतदेह अडकलेला पाहून रस्त्याने जाणाऱ्याने पोलिसांना फोन केला. एका खासगी समारंभात वेलकम गर्ल म्हणून काम करून ही मुलगी काल रात्री उशिरा घरी परतत असल्याची माहिती आहे. त्याच दरम्यान त्यांचा अपघात झाला. सध्या गाडी चालवणारा आरोपी अमितसह चार तरुणांना पोलिसांनी अटक केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT