Metro Station Slab Collapses Esakal
देश

Metro Station Slab Collapses: मेट्रो स्टेशनचा भाग कोसळला, अनेक जण अडकले, एकाचा मृत्यू?

Metro Station Slab Collapses: दिल्ली मेट्रोच्या गोकुळपुरी स्थानकावर आज (गुरुवारी) अपघात झाला. स्टेशनचा काही भाग कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशाची राजधानी दिल्लीत आज (गुरुवारी) गोकुळपुरी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या बाजूच्या भिंतीचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, तर ढिगाऱ्याखाली दबल्याने दोन जण जखमी झाले आहेत. सध्या पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा रस्ता बंद करण्यात आला आहे. अपघातानंतर या मार्गावरील मेट्रो ट्रेन सध्या एकाच मार्गावर चालवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (गुरुवारी) दिल्ली मेट्रोच्या गोकुळपुरी स्थानकावर अपघात झाला आहे. स्टेशनचा काही भाग कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, परंतु अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने मृत्यूची पुष्टी केलेली नाही. दरम्यान, दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज सकाळी 11 च्या सुमारास गोकुळपुरी मेट्रो स्टेशनच्या पूर्वेकडील सीमा भिंतीचा काही भाग खाली रस्त्यावर पडला. ढिगाऱ्याखाली एक जण अडकून गंभीर जखमी झाला आहे, तर इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. काही लोकांच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्यात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. घटनेच्या वेळी त्याच्या स्कूटरवरून जात होता. जखमींना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे. जेसीबी आणि क्रेनच्या साहाय्याने ढिगारा हटवण्यात येत आहे. स्थानिक पोलीस आणि मेट्रोचे कर्मचारी घटनास्थळी हजर आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT