देश

CCTVच्या संख्येत दिल्लीची बाजी; लंडन, न्यूयॉर्कलाही टाकलं मागे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सुरक्षेच्‍या कारणासाठी बहुतेक ठिकाणी सीसी टीव्ही उभारलेले दिसतात. यात जगभरातील मोठ्या शहरांना मागे टाकत राजधानी दिल्लीने बाजी मारली आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रति वर्ग मैल एवढ्या अंतरात सर्वांत जास्त सीसी टीव्ही उभारलेले दिल्ली हे जगातील पहिले शहर ठरले आहे. राजधानीत प्रति वर्ग मैल क्षेत्रात एक हजार ८२६.६ सीसी टीव्‍ही लावले आहेत.

सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या शहरांची यादी ‘फोर्ब्स इंडिया’ने जाहीर केली आहे. यात जगातील १५० शहरांची तुलना केली असून दिल्लीला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे. यादीत भारतातील दिल्ली व्यतिरिक्त चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे प्रति वर्ग मैल क्षेत्रात ६०९.९ कॅमेरे लावले आहेत तर आर्थिक राजधानी मुंबईत हेच प्रमाण १५७.४ कॅमेरे असे आहे. मुंबई १८व्या स्थानी आहे. सीसी टीव्हीच्या मुद्यावर दिल्लीने चीनमधील शेंनझेन (५२०.१), वुक्झी (४७२.७), क्विंगडाओ (४१५.८), शांघाय (४०८.५) या बड्या शहरांनाही मागे सोडले आहे. जगाचा विचार करता या शहरांमध्ये सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची संख्‍या जास्त आहे. याच श्रेणीत दिल्लीने लंडन, सिंगापूर, न्यूयॉर्क आणि मॉस्को आदी महानगरांवरही बाजी मारली आहे.

‘फोर्ब्स’ची यादी सोशल मीडियावर शेअर करीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. ‘‘दिल्लीने प्रति वर्ग मैल क्षेत्रात सर्वाधिक सीसी टीव्ही कॅमेरे उभारण्यात शांघाय, लंडन, न्यूयॉर्क अशा शहरांना मागे टाकले, याचा अभिमान वाटत आहे. कॅमेरा उभारणी उपक्रमात काम करणारे अधिकारी व अभियंत्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्यामुळेच कमी वेळेत आपण हे यश मिळविले आहे,’’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दिल्ली सरकार म्हणते...

-राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध

- दिल्लीत आतापर्यंत २.७५ लाख सीसी टीव्ही उभारले

- आगामी काही महिन्यांत १.४ लाख आणखी कॅमेरे लावणार

- कॅमेऱ्यांच्या हार्डवेअरची नियमित तपासणी

- कॅमेऱ्यातील चित्रीकरण सुरक्षित व गोपनीय

जगातील प्रमुख शहरांमधील सीसी टीव्हींची संख्या (प्रति वर्ग मैल क्षेत्र)

दिल्ली - १, ८२६.६

लंडन - १,१३८.५

चेन्नई - ६०९.९

शेंनझेन - ५२०.१

वुक्झी - ४७२.७

क्विंगडाओ - ४१५.८

शांघाय - ४०८.५

सिंगापूर - ३८७.६

मॉस्को - २१०

न्यूयॉर्क - १९३.७

मुंबई - १५७.४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: प्रचार सभेतील केजरीवालांच्या विधानावर ईडीचा आक्षेप! सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं? वाचा

SRH vs GT Live Score : गुजरात जाता जाता हैदराबादला धक्का देणार की SRH प्ले ऑफचं तिकीट सेफ करणार?

Fact Check: प्रभू श्रीरामांची प्रतिकृती हातात घेतलेला ओवेसींचा 'तो' फोटो एडिटेड

Latest Marathi News Live Update : श्रीकांत शिंदेंच्या संकल्पपत्राचे अनावरण

ED Action : ''जप्त रक्कम मंत्री आलम यांचीच'', ‘ईडी’चा न्यायालयात दावा; प्रत्येक कंत्राटामध्ये १.५ टक्के वाटा

SCROLL FOR NEXT