central vista sakal media
देश

सेंट्रल व्हिस्टाला स्थगितीची मागणी दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

सूरज यादव

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना नवी संसद आणि सेंट्रल व्हिस्टा (Central Vista) प्रकल्प उभारला जात आहे. यामुळे पैशांची उधळपट्टी केंद्र सरकार (Modi Government) करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामाविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं की , कामगार प्रकल्पाच्या ठिकाणी राहत आहेत. काम थांबवण्याचा प्रश्नच येत नाही.

नवीन संसद आणि सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामासाठी हजारो कोटींची खर्च येणार आहे. सध्या कोरोनाच्या संकटात इतका खर्च कशासाठी? तो थांबवावा अशी मागणी कऱणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. याआधी काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या नावाखाली होणारी उधळपट्टी थांबवावी अशी मागणी राज्यसभेत केली होती.

संसदेची नवी इमारत त्रिकोणी आकाराची असणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत म्हणजेच २०२२ पर्यंत याचं बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित आहे. टाटा प्रोजेक्टस लि.कडून बांधल्या जाणाऱ्या या इमारतीसाठी ९७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. इमारतीच्या बांधकामाला उशिरा सुरुवात झाली असली तरी, बांधकाम वेळेवर पूर्ण होईल अशी माहिती कंपनीने दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT