Arvind_Kejriwal 
देश

मोदींपेक्षा माझी आरोग्य योजना भारी; केजरीवालांची भूमिका

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी 'आयुष्यमान भारत' योजना दिल्लीत लागू करण्यास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट नकार दिला आहे. आपल्या सरकारची 'दिल्ली आरोग्य योजना' या योजनेपेक्षा दहापटींनी व्यापक व लाभदायक ठरली असल्याचा दावा त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. केजरीवालांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडताना भाजपने, ते व्यक्तिगत अहंकारापायी गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळ करत असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून "आयुष्यमान भारत'ची जाहिरात केली जाते. केजरीवाल यांनी मात्र ती दिल्लीतील रुग्णालयांत लागू करण्यास नकार दिला आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी, केंद्रीय योजनेमुळे फक्त विमा कंपन्यांना नफा होत असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील किमान 26 मोठ्या रुग्णालयांपैकी "एम्स', सफदरजंग, राममनोहर लोहियासारखी निवडक रुग्णालये वगळता मौलाना आझाद, अरुणा असफअली, गोविंद वल्लभ पंत आदी किमान 15 रुग्णालये संपूर्णपणे दिल्ली सरकारच्या ताब्यात आहेत.

हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पत्रात केजरीवाल यांनी म्हटले आहे, की या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्तर प्रदेश व हरियानातील रुग्णही दिल्लीत येतात. मात्र दिल्लीच्या आरोग्य योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर येथील रुग्ण क्वचितच त्या राज्यांत जात असतील. एक आरोग्य योजना चांगल्या पद्धतीने लागू होत असताना दुसरी योजना लागू करणे कोणाच्याच हिताचे ठरणार नाही. "आयुष्यमान भारत' दिल्लीत लागू करणार नाही. या योजनेच्या लाभार्थींना केवळ पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातील. मात्र दिल्ली सरकारच्या योजनेत उपचारांचा खर्च 30 लाख किंवा त्यापेक्षा कितीही जास्त झाला तरी तो सरकार उचलते. 

हे अहंकाराचे लक्षण : जाजू 
केजरीवाल यांच्या नव्या पवित्र्यावर भाजपने जोरदार हल्ला चढविला आहे. भाजपचे दिल्ली प्रभारी श्‍याम जाजू यांनी "सकाळ'ला सांगितले, की सरकार कोणत्याही एका पक्षाचे नव्हे, तर ते जनतेचे व जनतेसाठी असते. "आयुष्यमान भारत'चे श्रेय मोदींना जाईल, केवळ या आकसापोटी सारी योजनाच नाकारणे हे टोकाचा अहंकार व क्षुद्रपणाचे लक्षण आहे. केंद्राची योजना निश्‍चितच सर्व समाजघटकांसाठी अधिक लाभदायक असल्याचे सिद्ध झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT