देश

VIDEO - राजधानीला पावसाने झोडपले, रस्त्यावर पाणी, वाहतुकीचा खोळंबा

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली - एनसीआरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे.

नवी दिल्ली - दिल्ली - एनसीआरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. यंदाच्या हंगामातील पावसाचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. भारतीय हवामान विभागाने म्हटलं की, सफदरजंग ऑब्जर्वेटरीमध्ये गेल्या 24 तासात 138.8 मिलीमीटर पाऊस झाला. दिल्लीत यंदाच्या पावसाळ्यात एका दिवसात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. या पावसाने अनेक रस्त्यांवर पाणी साचलं असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दिल्लीत वीजांसह पाऊस पडत असून तो थांबण्याची शक्यता कमी आहे. पावसामुळे गेल्या दहा दिवसापासून सुरु असलेला उकाड्याच्या त्रासातून दिलासा मिळाला. पण सलग चार पाच तास पावसाने अनेक भागात पाणी साचले आहे. दिल्लीत आधीच्या काही आठवड्यांमध्ये झालेल्या पावसावेळी यमुनेच्या पाण्याने धोका पातळी गाठली होती.

हवामान विभागाने म्हटलं की, दिल्ली आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात काही तास असाच पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या सफदरजंगमध्ये शुक्रवार ते शनिवार रात्री अडीच ते सकाळी साडेपाच वाजेपर्यंत 73.2 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

पावसाचं वातावरण पुढचे काही दिवस राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने दिल्लीत पावसाबाबत ऑरेंज अलर्ट दिला आहे. पावसामुळे आयटीओ-प्रगती मैदान रोडवर पाणी आलं आहे. अनेकांच्या गाड्या या पाण्यात अडकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर शेअर बाजार लाल! Adani आणि Tata शेअर फोकसमध्ये; कोणते शेअर्स घसरले?

Asian Boxing Championship 2026 मीनाक्षी, जास्मिनची उपांत्य फेरीत धडक; आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत वाटचाल

Amravati News: खारी येथे आगीत तीन घरे जळून खाक; घरातील साहित्य जळाले, कुटुंबे आली उघड्यावर

Badminton Camp: राज्यस्तरीय बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर; ३५ वर्षांचा यशस्वी प्रवास, तीन टप्प्यांत सराव

Vidarbha News: पोपटांनी मक्याची कणसे केली फस्त; शेतकरी त्रस्त, सकाळीच करतात पिकावर हल्ला

SCROLL FOR NEXT