Arvind Kejriwal esakal
देश

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांना हायकोर्टाचा मोठा दिलासा! मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यास दिला नकार

Arvind Kejriwal: केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात न्यायालयीन हस्तक्षेपाला वाव नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

Sandip Kapde

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सरकारच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची विनंती करणारी जनहित याचिका (पीआयएल) दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात न्यायालयीन हस्तक्षेपाला वाव नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली हायकोर्टाक दाखल करण्यात आली होती. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांच्या खंडपिठाने ही याचिका फेटाळली आहे.

अटक केलेल्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्यास मनाई करणाऱ्या कायद्यातील कोणताही अडथळा याचिकाकर्ता दाखवण्यात अयशस्वी ठरला आहे. अटक असताना पदावर राहण्यास कुठे मनाई आहे हे आम्हाला दाखवा, असे कोर्टाने म्हटले आहे. (State Excise Department News in Marathi)

"संवैधानिक बिघाड झाल्यास, राष्ट्रपती किंवा राज्यपाल त्यावर कारवाई करतील... यात न्यायालयीन हस्तक्षेपाला वाव आहे का? राज्यपाल या प्रकरणाची तपासणी करत आहे. हे प्रकरण राष्ट्रपतींकडे जाईल. यामध्ये न्यायालयीन हस्तक्षेपाला वाव नाही," असे हायकोर्टाने म्हटले आहे.

शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ता असल्याचा दावा करणाऱ्या दिल्लीतील रहिवासी सुरजित सिंग यादव यांनी ही याचिका दाखल केली होती. आर्थिक घोटाळ्याचा आरोप असलेल्या मुख्यमंत्र्यांना सार्वजनिक पदावर राहण्याची परवानगी देऊ नये, असा दावा त्यांनी केला.

अरविंद केजरीवाल सध्या ईडीच्या कोठडीत असून त्याची मुदत आज संपत आहे. त्याला आज शहरातील राऊस अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सादिल खर्चाअभावी शाळा 'व्हेंटिलेटर'वर; झेडपी शाळांची आर्थिक नाकेबंदी; शिक्षक, मुख्याध्यापकांना 'वर्गणी'चा आधार?

Lokayukta Raid : ...अन् 1 लाखाचा सौदा 75 हजारांवर ठरला! दुकानाचा ताबा मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडलं

Bike tyre replacement : टू-व्हीलर गाडीचे टायर किती दिवसांनी बदलावेत? मोठं नुकसान होण्याआधीच जाणून घ्या

Mumbai News: बीएमसीची मोठी कारवाई! मुंबईतील ५० वर्ष जुन्या दर्ग्यावर बुलडोझर, व्हिडिओ व्हायरल

India Nepal Border Dispute : लिपुलेख-कालापानी वादात चीनची एन्ट्री? भारताने नेपाळला सुनावले; द्विपक्षीय यंत्रणा असताना तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही!

SCROLL FOR NEXT