Arvind Kejriwal esakal
देश

Arvind Kejriwal: ईडीचा दणका! दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची सुटका थांबवली, नेमकं कारण काय?

Arvind Kejriwal : ट्रायल कोर्टाने काल गुरुवारी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. न्यायाधीश निया बिंदू यांनी केजरीवाल यांची एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश दिले होते.

Sandip Kapde

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ट्रायल कोर्टाच्या जामीन आदेशाला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात आव्हान दिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका थांबवली. केजरीवालांच्या जामीनाला विरोध करण्यासाठी आम्हाला संधी देण्यात आली नाही, असे ईडीचा वकिलांनी न्यायालयात सांगितले.

अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी स्थगितीच्या विनंतीला विरोध केला. "जामीन रद्द करणे हे जामीन देण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे दहा निकाल आहेत", असे सिंघवी यांनी स्पष्ट केले. मात्र हायकोर्टाने वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी होत नाही तोपर्यंत जामीन आदेश लागू करू नये, असे निर्देश  देण्यात आले आहेत.

"जामीन आदेश लागू केला जाणार नाही. आम्ही अंतिम आदेश दिलेला नाही. तुम्ही जमेल तितका युक्तिवाद करू शकता," असे म्हणत कोर्टाने केजरीवालांच्या सुटकेला स्थगिती दिली.

ट्रायल कोर्टाने काल गुरुवारी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता . न्यायाधीश निया बिंदू यांनी केजरीवाल यांची एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश दिले होते. मात्र ईडीने न्यायालयाला केजरीवाल यांच्या सुटकेला ४८ तासांसाठी स्थगिती देण्याची विनंती केली होती, परंतु न्यायाधीशांनी ही विनंती नाकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT