court sakal
देश

बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्यानं गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही - HC

अशा प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलीच्या परवानगीचा काहीच अर्थ उरत नाही, काही कायद्यामध्ये त्याला काहीही महत्त्व नाही, असंही न्यायालयाने सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्याने आणि मूल झाल्याने गुन्ह्याची गंभीरता कमी होत नाही, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. अशा प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलीच्या परवानगीचा काहीच अर्थ उरत नाही, काही कायद्यामध्ये त्याला काहीही महत्त्व नाही, असंही दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

न्यायमूर्ती अनुप कुमार मेंदीरत्ता यांनी या प्रकरणी दाखल करण्यात आलेली आरोपीची जामिनासाठीची याचिका फेटाळली आहे. निर्णय देताना सांगितलं की, फुस लावून अल्पवयीन मुलीशी शारिरीक संबंध ठेवल्यानंतर तिच्या परवानगीचा काहीही अर्थ नाही. कारण हे दुष्कृत्य केवळ पीडितेच्या विरोधातच नाही तर समाजाविरोधातही गुन्हा आहे. या प्रकरणात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने तिच्या १५ वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं. ही मुलगी जुलै २०१९ पासून बेपत्ता होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये ही मुलगी याचिकाकर्त्याच्या घरात आठ महिन्यांच्या बाळासोबत दिसली.

न्यायालयाने सांगितलं की, मुलांचं लैंगिक शोषण हा गुन्हा आहे. कायद्याने अल्पवयीनांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास मनाई केली आहे. मग हे संबंध अल्पवयीन पत्नीसोबत असले तरीही त्याला परवानगी नाही. संमतीने संबंध ठेवणं आणि त्यातून मूल जन्माला येणं यामुळे गुन्ह्याची गंभीरता कमी होत नाही. याचिकाकर्त्याने सांगितलं की, त्याने पीडितेसोबत एका मंदिरात लग्न केलं होतं. पण यामुळे हा गुन्हा माफ होत नाही. कारण त्यावेळी पीडित मुलगी १५ वर्षांपेक्षाही कमी वयाची होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : कमीत कमी प्रदूषण अन् शक्य तितक्या पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करू : मुख्यमंत्री फडणवीस

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT