Arvind Kejriwal esakal
देश

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा; CM पदावरून हटवण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. CM पदावरून हटवण्याची याचिका उच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. CM पदावरून हटवण्याची याचिका उच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे. अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी दुसरी जनहित याचिका स्वीकारण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचे निर्देश देणारी जनहित याचिका (पीआयएल) स्वीकारण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने आज (गुरुवारी) नकार दिला.

अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचे निर्देश देणारी जनहित याचिका हिंदू सेना नावाच्या संघटनेचे अध्यक्ष असलेल्या विष्णू गुप्ता यांनी दाखल केली होती.गुप्ता यांनी दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेचे कारण देत केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली.

कोर्टाने सांगितले की ते या मुद्द्यावर निर्णय घेऊ शकत नाही आणि दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) किंवा भारताचे राष्ट्रपती यावर निर्णय घेऊ शकतात.

"सरकार काम करत नाही हे आपण कसे म्हणू शकतो? दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर हे निर्णय घेण्यास पूर्णपणे सक्षम आहे. त्यांना (एलजी) आमच्या मार्गदर्शनाची गरज नाही. त्याला सल्ला देणारे आम्ही कोणी नाही. कायद्यानुसार जे काही करायचे ते करतील ", असंही न्यायालयाने सांगितले आहे.

न्यायालयाने पुढे सांगितले की, ते यामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि भारताचे राष्ट्रपती किंवा एलजी यालर निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे याचिकाकर्ता संबंधित प्राधिकरणाकडे जाऊ शकतो, असे त्यात म्हटले आहे. त्यानंतर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT