Arvind Kejriwal sakal
देश

Arvind Kejriwal Arrest : दिल्ली उच्च न्यायालयाची सीबीआयला नोटीस! केजरीवाल यांची याचिका: सुनावणी १७ जुलै रोजी होणार

Arvind Kejriwal Arrest Latest News : मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. २: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अटकेला आव्हान देत दाखल केलेल्या याचिकेवरुन दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावली आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होईल. दरम्यान, मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणातील अन्य आरोपी बीआरएस नेत्या के. कविता यांना जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. तर सीबीआयने गेल्या २६ जून रोजी त्यांना अटक केली होती. सीबीआयकडून झालेल्या अटकेला तसेच सुनावण्यात आलेल्या कोठडीला आव्हान देत केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीबीआयकडून झालेली अटक बेकायदा असल्याचा युक्तिवाद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सुनावणीदरम्यान केला. यावर सात दिवसांत उत्तर सादर करावे, असे सांगत न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावली.

कविता यांना जामीन देण्यास नकार


गंभीर आरोप आणि पुरावे लक्षात घेता बीआरएस नेत्या के. कविता यांना जामीन देता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने अन्य एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. के. कविता या उच्चशिक्षित महिला असून राजकारण आणि समाजकारणात त्यांनी मोलाचे योगदान दिले असल्याचे कविता यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले. त्यावर आपणास हे ऐकून बरे वाटले. मात्र त्यांना जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT