vaccine1
vaccine1 
देश

मोठी अपडेट; डिसेंबरमध्येच देशात दाखल होणार कोरोना लशीची पहिली खेप

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशात लवकरच कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी लशीकरण सुरु होणार आहे. 28 डिसेंबर रोजी दिल्लीत कोरोना लशीची पहिली खेप येणार आहे. देशात कोरोना लशीची तयारी चार वेगवेगळ्या कंपन्या करत आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच कोरोना लस उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं होतं. 

दिल्ली एअरपोर्टच्या सीईओने दिली आनंदाची बातमी

दिल्ली एअरपोर्टचे सीईओ विदेह कुमार जयपुरिया (Videh Kumar Jaipuria) यांनी सांगितलं की, 28 डिसेंबर रोजी कोरोना लशीची पहिली खेप येईल. या दिवशी 80 लाख लशीचे डोस आपल्याला मिळतील. 

केंद्र सरकारची तयारी

केंद्राने राज्य सरकारांना सोबत घेऊन गेल्या काही महिन्यांपासूनच लशीकरणाची तयारी सुरु केली आहे. राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. मास्टर ट्रेनर्संना ट्रेनिंग देण्यात आली आहे, जे देशातील हजारो स्वयंसेवकांना ट्रेनिंग देतील. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, 260 जिल्ह्यातील 20 हजारांपेक्षा अधिक लोकांना आतापर्यंत ट्रेनिंग मिळाली आहे. 

लशीच्या डिलिव्हरीची रियल-टाईम मॉनिटरिंग होणार

Co-WIN नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे लशीच्या डिलिव्हरीची रियल-टाईम मॉनिटरिंग शक्य होईल. याचे मोबाईल अॅपही विकसित करण्यात आले आहे. Co-WIN प्लॅटफॉर्मने लशीच्या तापमानाचीही ट्रॅकिंग केली जाऊ शकते. 

जानेवारीपासून सुरु होईल लशीकरण

देशभरात 28,000 ते 29,000 कोल्ड चेन पॉइंट्स आहेत, ज्यांना स्ट्रीमलाईन केलं जात आहे. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनुसार, जानेवारी महिन्यापासून लशीकरण सुरु होईल. सुरुवातीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB Live Score : पंजाब किंग्जचंही चोख प्रत्युत्तर; रूसोची आक्रमक खेळी

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT