Begger 
देश

दिल्ली: कोरोनाकाळात नोकरी गेल्याने अनेकांनी निवडला भीक मागण्याचा मार्ग

बहुतांश भिकाऱ्यांना मजबुरीने हा काम कराव लागतय.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: सामाजिक-आर्थिक परिस्थितीच्या अनुषंगाने राजधानी दिल्लीमध्ये (delhi) भिकाऱ्यांसंबंधी (begging) एक सर्वेक्षण करण्यात आलय. यामध्ये निम्म्याहून अधिक म्हणजे ५२ टक्के भिकाऱ्यांनी मागच्या पाच वर्षात भीक मागायला सुरुवात केल्याचं समोर आलं आहे. ४० टक्के पूर्वीपासूनच भीक मागत आहेत. फक्त आठ टक्के जन्मापासून भीक मागत आहेत.

राजधानी दिल्लीत ज्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं, त्यातल्या बहुतांश भिकाऱ्यांना मजबुरीने हा काम कराव लागतय. गरीबी, बेरोजगारी, अशिक्षितपणा तसचं वृद्धपकाळ, अपंगत्व आणि आजारपण अशी भीक मागण्यामागे वेगवेगळी कारण आहेत. कोविड-१९ मुळे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, उपजिवीकेच साधन गेलं, त्यांनी सुद्धा भीक मागण्याचा मार्ग चोखळला. ज्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं, ते सर्वच पूर्णवेळ भिकारी नाहीयत. काहीजण आपला खर्च भागवण्यासाठी इतर कामही करतात.

काहीजण बांधकाम साईटवर आणि कारखान्यात मंजूर म्हणूनही काम करतात. काहींनी दिल्लीतल्या वेगवेगळया भागात त्यांचे कुटुंबीयही भीक मागत असल्याचे सांगितले. २०,७१९ पेक्षा जास्त भिकाऱ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यातले ६५ टक्के भिकारी दिवसाला २०० रुपयापेक्षा कमी पैसे कमावत असल्याचं समोर आलं. २३ टक्के भिकारीच दिवसाला २०० ते ५०० रुपये कमावतात. ५५ टक्के भिकारी बेघर आहेत तर ४५ टक्के भिकारी झुग्गी झोपडीमध्ये राहतात. यावर्षी फेब्रवारी ते एप्रिल या कालावधीत IHD ने हे सर्वेक्षण केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: गॅस सिलिंडर वेटिंग कमी झाली, तरी नागरिकांची अडचण कायम आहे; युद्धानंतर गॅस पुरवठा विस्कळीत; वेटिंग अजूनही हजारोंमध्ये

Chhatrapati Sambhajinagar: उन्हाच्या चटक्याने हवा प्रदूषणातही वाढ ; शहराचा एक्यूआय १४० च्या घरात; संवेदनशील गटांसाठी धोक्याची घंटा

Kairi Poha Recipe: काय? तुम्ही अजून 'कैरी पोहे' ट्राय नाही केले? जाणून घ्या अस्सल कोकणी चवीची सोपी रेसिपी

Chhatrapati Sambhajinagar: खर्चाचा भुर्दंड नागरिकांवर नको; पाण्याच्या मीटरचा ५१४ कोटींचा नव्याने प्रस्ताव

Trimbakeshwar VIP Darshan Scam: त्र्यंबकेश्‍वर देवस्थान विश्‍वस्त कडलगला अटक

SCROLL FOR NEXT