Delhi  Sakal
देश

Independence Day : दिल्लीत 15 ऑगस्टपूर्वीच मोठा कट उधळला; 2 हजार जिवंत काडतुसं जप्त

सकाळ डिजिटल टीम

Independence Day : देशाची राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाच्या दोनदिवस आधी जिवंत काडतुसांचा मोठा साठा जप्त केला आहे. यामुळे स्वतंत्र्यदिनाच्या दिवशी संभव्य हल्ल्याचा कट रचण्याचा डाव होता का? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. या कारवाईदरम्यान दिल्ली पोलिसांनी २ हजार जिवंत काडतुसे जप्त केली असून, काडतुसांचा पुरवठा करणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पूर्व दिल्ली पोलिसांनी पुरवठादाराला आनंद विहार परिसरातून 2 बॅगांसह अटक केली असून, हे ही काडतुसं कुणाला पुरवणा होते तसेच याचा वापर नेमका कुठे केला जाणार होता याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

देशात 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला जाणार असून, त्यासाठी मोठी जय्यत तयारी केली जात आहे. या विशेष महोतस्वासाठी देशभरात हर घर तिरंगा मोहीम देखील राबवली जाणार आहे. दरम्यान, या काळात देशात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाल्या असून, सर्व राज्यातील सुरक्षा यंत्रणांना सजग राहण्याच्या सूचना देण्यात आला आहे.

या सोहळ्यासाठी दिल्लीत मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली असून, संपूर्ण दिल्लीसह लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आनंद विहार परिसरात दोन संशयितांकडे शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठून संशयिताची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 2000 जिवंत काडतुसे असलेल्या दोन पिशव्या सापडल्या. यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्यासह अन्य साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. सध्या या सर्वांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT