K. Kavita Esakal
देश

Delhi Liquor Case : बीआरएस नेत्या के. कविता यांना सीबीआयकडून अटक

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांना सीबीआयने गुरुवारी अटक केली. कविता यांना ईडीने 15 मार्च रोजी हैदराबाद येथून अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.

मद्य धोरण प्रकरणातील साक्षीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न कविता यांनी केल्याचे दिसून आले आहे. जामीन देण्यात आला तर त्या पुन्हा साक्षीदारांना प्रभावित करू शकतात, असे सांगत न्यायालयाने कविता यांची कोठडी 23 तारखेपर्यंत वाढवली होती.

आता सीबीआयकडून कारवाईला सुरुवात झाल्याने कविता यांच्या अडचणीत भर पडली आहे. मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित दक्षिणेतील लॉबीच्या कविता या सदस्या असून त्यांनी आम आदमी पक्षाच्या नेत्यांना शंभर कोटी रुपयांची लाच दिली असल्याचा ईडीचा आरोप आहे. या लाचेच्या बदल्यात दक्षिण लॉबीला दिल्लीत मोठ्या मद्य विक्रीचे परवाने देण्यात आले असल्याचेही ईडीचे म्हणणे आहे.

दुसरीकडे ‘ईडी’कडून झालेली अटक आणि न्यायालयाने सुनावलेल्या कोठडीच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र तिथेही न्यायालयाने ‘ईडी’ने पुरेशा पुराव्यांच्या आधारे केजरीवाल यांना अटक केली असल्याचे सांगत त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यावर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

केजरीवाल यांच्या याचिकेची सुनावणी घेण्यासाठी विशेष खंडपीठ स्थापले जाणार नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. या याचिकेवर लवकर सुनावणी घेणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद ॲड. अभिषेक मनू सिंघवी यांनी केला असता तुम्ही याचिकेच्या संदर्भात ई - मेल केला आहे का? अशी विचारणा सरन्यायाधीशांनी त्यांना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT