K. Kavita Esakal
देश

Delhi Liquor Case : शंभर कोटी कुणाला मिळाले? अन् कोण बनला मोहरा? के. कवितांवरुन CBI चा कोर्टात मोठा खुलासा

''आम आदमी पक्षाला शंभर कोटी रुपये अरेंज करुन देण्यामध्ये के. कविता यांचा मोठा हात आहे. या प्रकरणात त्या मुख्य कट करणाऱ्या आहेत. एका मोठ्या उद्योगपतीने अरविंद केजरीवाल यांच्याशी बोलणी केली आणि केजरीवालांनी त्यांना मद्य धोरणाच्या माध्यमातून सहकार्य केलं.''

संतोष कानडे

BRS Leader K. Kavita : दिल्लीतल्या कथित दारु घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये तपास यंत्रणांकडून सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. शुक्रवारी सीबीआयने बीआरएस नेत्या के. कविता यांना कोर्टासमोर सादर केलं. सीबीआयने कोर्टाकडे के. कविता यांच्यासाठी पाच दिवसांची कोठडी मागितली आहे.

के. कविता यांना गुरुवारी अटक

मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांना सीबीआयने गुरुवारी अटक केली. कविता यांना ईडीने 15 मार्च रोजी हैदराबाद येथून अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मद्य धोरण प्रकरणातील साक्षीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न कविता यांनी केल्याचे दिसून आले आहे. जामीन देण्यात आला तर त्या पुन्हा साक्षीदारांना प्रभावित करू शकतात, असे सांगत न्यायालयाने कविता यांची कोठडी 23 तारखेपर्यंत वाढवली होती. आता सीबीआयकडून कारवाईला सुरुवात झाल्याने कविता यांच्या अडचणीत भर पडली आहे.

सीबीआयने शुक्रवारी म्हटलं की, आम आदमी पक्षाला शंभर कोटी रुपये अरेंज करुन देण्यामध्ये के. कविता यांचा मोठा हात आहे. या प्रकरणात त्या मुख्य कट करणाऱ्या आहेत. एका मोठ्या उद्योगपतीने अरविंद केजरीवाल यांच्याशी बोलणी केली आणि केजरीवालांनी त्यांना मद्य धोरणाच्या माध्यमातून सहकार्य केलं.

सीबीआयने कोर्टात पुढे म्हटलं की, के. कविता यांनी सरतचंद्र रेड्डी यांना बोलणी करण्यासाठी पुढे केलं. दिनेश अरोरा यांनी आपल्या जबाबाची पुष्टी केली की अभिषेक बोईनपल्लीने सांगितलं की, विजय नायर यांना शंभर कोटी रुपये दिले आहेत. सीबीआयने आपल्या युक्तीवादाच्या समर्थनासाठी सरकारी साक्षीदार दिनेश अरोरा यांच्या जबाबाबाचा हवाला दिला.

सीबीआयने न्यायालयाला पुढे सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित अनेक आरोपींचे जबाब नोंदवण्यात असून हॉटेल ताज येथे यासंदर्भात बैठक झाली होती. मार्च ते मे २०२१ मध्ये, अबकारी धोरण बनवण्याची प्रक्रिया सुरू असताना अरुण पिल्लई, बुची बाबू, बोईनपल्ली हे सर्वजण दिल्लीतील हॉटेल ताजमध्ये थांबले होते.

सीबीआयने पुढे सांगितले की, के. कविता यांनी हैदराबादमध्ये व्यावसायिकाची भेट घेतली होती. एवढेच नाही तर विजय नायरच्या संपर्कात के. कविता होत्या. कविता यांनी व्यावसायिकाला 100 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम देण्यास सांगितले होते, असं कोर्टाला सांगण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT