Delhi Liquor Scam Manish Sisodia Esakal
देश

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Manish Sisodia: "दिल्लीच्या केजरीवाल सरकारमधील अनेक मंत्री यात सहभागी झाले आहेत. ईडीने नुकतेच केजरीवाल यांचे या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून नाव दिले आहे."

आशुतोष मसगौंडे

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणात राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १५ मेपर्यंत वाढ केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआय प्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चित करण्याबाबतची सुनावणी 15 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. (Delhi Liquor Scam Manish Sisodia)

दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात आता पुढील सुनावणी १५ मे रोजी होणार आहे. याशिवाय दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगशी संबंधित ईडी प्रकरणात सिसोदिया आधीच 8 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणा दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सिसोदिया यांच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती.

ईडी आणि सीबीआयने दिल्ली मद्य धोरणाची अंमलबजावणी आणि तयारीमध्ये अनियमितता झाल्याचा दावा केला आहे.

दिल्लीच्या केजरीवाल सरकारमधील अनेक मंत्री यात सहभागी झाले आहेत. ईडीने नुकतेच केजरीवाल यांचे या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून नाव दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जवसुलीबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे, RBIची कठोर नियमावली जारी

Tukaram Mundhe: ‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भावना

घरात ठेवा ही एक छोटीशी वस्तू; नशीब पालटेल, अनुष्का शर्माच्या यशामागेही आहे खास कनेक्शन!

Marathi News Live Updates : पुण्यात प्रसिद्ध पबवर पोलिसांची पहाटे धाड, ८०हून अधिक तरुण तरुणी ताब्यात

Car Accident News : LPG सिलिंडरच्या ट्रकला कारची धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT