Delhi man who stopped car on flyover for reel Esakal
देश

Reel बनवत असाल तर सावधान! पोलिसांनी एकाला ठोठावला तब्बल 36 हजारांचा दंड, नेमका काय आहे कारण?

Delhi man who stopped car on flyover for reel: सध्या रील्स बनवण्यासाठी अनेक जण काहीही स्टंट करताना दिसून येतात. अशातच एका व्यक्तीला 36,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका इंस्टाग्राम रीलसाठी या व्यक्तीने रस्त्याच्या मधोमध आपली कार थांबवून वाहतूक विस्कळीत केली होती.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Delhi man who stopped car on flyover for reel: अनेकजण सोशल मिडीयावर फेमस होण्यासाठी अनेक जण स्टंट करतानाचे रील शेअर करत असतात. फेमस होण्याच्या प्रयत्नात अनेकदा त्यांना मोठा फटका देखील बसतो. अशाच काहीसा प्रकार समोर आला आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनी एका व्यक्तीला 36,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका इंस्टाग्राम रीलसाठी या व्यक्तीने रस्त्याच्या मधोमध आपली कार थांबवून वाहतूक विस्कळीत केली होती.

दरम्यान, प्रदीप ढाका असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी वाहनही जप्त केले असून प्रदीप ढाकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्रदीप ढाका यांनी गर्दीच्या वेळी दिल्लीच्या पश्चिम विहारमधील उड्डाणपुलावर स्वतःची कार थांबवल्याचा व्हिडिओ अपलोड केला होता. या रीलमध्ये ते दरवाजा उघडा ठेवून कार चालवतानाही दिसले. शिवाय, प्रदीप ढाका यांनी पोलिसांच्या बॅरिकेड्सला आग लावली आणि व्हिडिओ अपलोड केला. दिल्ली पोलिसांनी प्रदीप ढाका यांच्यावर केलेल्या कारवाईची माहिती देणारा एक व्हिडिओ त्याच्या एक्स प्रोफाइलवर पोस्ट केला आणि त्याची कार कशी जप्त करण्यात आली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हे देखील सांगितले.

पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी त्याला भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रदीप ढाकाने आपल्या सोशल मीडिया स्टंटसाठी जी कार वापरली ती त्याच्या आईच्या नावावर नोंदणीकृत होती. पोलिसांना वाहनात प्लास्टिकची काही बनावट हत्यारेही सापडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT