Congress policy statement Himachal Pradesh development Sakal
देश

MCD Elections Result : दिल्ली महापालिका निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

आज दिल्ली महानगरपालीका निवडणुकाचे निकाल जाहीर झाले, या निवडणुकात आप पक्षाला बहुमत मिळालं आहे. या निकालानंतर दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कुमार यांनी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीनंतर जनतेचा निर्णय स्वीकारतो, कारण लोकशाहीत जनतेचा निर्णय सर्वोपरि आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे ते म्हणाले की, महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, जिथे दिल्लीने मोदींचा चेहरा नाकारला आहे. त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांच्या 230 जागा जिंकण्याच्या घोषणेचाही धुव्वा उडाला आहे. आगामी काळात काँग्रेस पक्ष जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावत दिल्लीच्या जनकल्याणासाठी आणि भल्यासाठी काम करत राहील.

हेही वाचा - Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

अनिल कुमार यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराचे लोकांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्याची मतांची टक्केवारी वाढली आहे. दिल्लीतील जनतेने मोदींचा चेहरा आणि भाजपची 15 वर्षांची राजवट नाकारली आहे. भारत जोडो यात्रा महापालिका निवडणुकीपूर्वी दिल्लीत पोहोचली असता तर निकाल वेगळा लागला असता. विधानसभा निवडणूक 2020 मध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी 10 टक्क्यांनी घसरली असून भाजपच्या मतांची टक्केवारी तशीच राहिली आहे.

अनिल कुमार म्हणाले की, मतांची टक्केवारी वाढल्याने कार्यकर्त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळेल, ज्यामुळे येत्या सार्वत्रिक निवडणुका आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा होईल. दिल्लीतील जनता केजरीवाल यांच्या जाहिरातींच्या गोंधळातून हळूहळू बाहेर येत असून शीला दीक्षित यांच्या कामाचा फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत होईल, असे देखील ते म्हणाले.

शेवटी अनिल कुमार म्हणाले की, दिल्लीच्या जनतेने एमसीडीमध्ये आम आदमी पार्टीला पूर्ण बहुमत दिले आहे. दिल्ली सरकार आणि दिल्ली महापालिकेत केजरीवाल यांचे सरकार असेल. तसेच केजरीवाल यांनी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पक्के करण्याचे आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अन्यथा दिल्ली काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव घसरले! चांदी तब्बल ₹8,000 ने स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Shoaib Akhtar : पाकिस्तानमधील क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर! भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

Australia vs Sri Lanka: झिम्बाब्वेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी, आज श्रीलंकेशी निर्णायक लढत

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

Mumbai : अल्पवयीनाने कारनं उडवलं, १० दिवसांनी पतीचा मृत्यू; पत्नीची प्रकृतीही चिंताजनक

SCROLL FOR NEXT