देश

Onion Issue : कांदाप्रश्नावरची दिल्लीतील बैठक संपली; पणनमंत्री अब्दुल सत्तार स्पष्टपणे म्हणाले...

संतोष कानडे

नवी दिल्लीः नाशिक बाजार समितीमधल्या व्यापाऱ्यांनी मागील अनेक दिवसांपासून कांदा खरेदी बंद केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून बाजारामध्ये कांद्याचे भाव वाढले आहेत. कांदा खरेदी सुरु करावी, यासाठी वारंवार मध्यस्थी करण्यात येत आहे. परंतु व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

नाशिकमधील व्यापाऱ्यांनी २० सप्टेंबरपासून कांदा खरेदी बंद केलीय. नाफेडने खरेदी केलेला कांदा कमी दरामध्ये काही व्यापारी इतर राज्यातील व्यापाऱ्यांना विक्री करतात, त्यामुळे कांद्याचे दर घसरले असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शिवाय बाजार समित्यांमध्ये लादलेले खरेदी शुल्क रद्द करुन बाजार फीस एक टक्क्यांवरुन अर्धा टक्का करावी, हीदेखील व्यापाऱ्यांची मागणी आहे.

कांदा खरेदीचा गुंता सोडवण्यासाठी शुक्रवारी दिल्लीमध्ये एक बैठक बोलावण्यात आलेली होती. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भारती पवार आणि राज्याचे पणन कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामध्ये ही बैठक संपन्न झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी व्यापाऱ्यांना आवाहन करत कांदा खरेदी सुरु करण्याची मागणी केली.

अब्दुल सत्तार म्हणाले की, 2 लाख टन कंदा खरेदीची परवानगी गोयल यांनी दिली आहे. व्यापाऱ्यांची मागणी होती की, भाव निश्चित ठरवावा. 545 मार्केट कमिट्यांमधून माहिती घेऊन 2 हजार 290 रुपये आजचा भाव आलेला आहे. सरकारच्या मागणीप्रमाणे ज्या-ज्या भागात कांदा शिल्लक असेल तिथं खरेदीला परवानगी दिली जाईल.

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

400 कोटी रुपयांची कांदा खरेदी सरकार करणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होईल. 40 टक्क्यांबाबत आम्ही विनंती केली आहे. मला वाटतंय शेतकरी बांधवांचं हित लक्षात घेऊन आम्ही व्यापाऱ्यांना बोलावून निर्णय घेऊ. तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की खरेदी सुरू करा, असं आवाहन त्यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT