Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana 
देश

Delhi Govt : दिल्लीत 18 वर्षांवरील सर्व महिलांना महिन्याला मिळणार हजार रुपये! जाणून घ्या काय आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना

Delhi Govt : दिल्लीत 18 वर्षांवरील सर्व महिलांना महिन्याला मिळणार हजार रुपये! जाणून घ्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजना?

रोहित कणसे

Delhi Mukhyamantri Mahila Samman Yojana : दिल्लीत अरविंद केजरीवाल सराकरने सोमवारी सादर केलेल्या बजेटमध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीच्या अर्थमंत्री आतिषी यांनी आपलं पहिलं बजेट सादर करताना मुख्यमंत्री महिला सम्मान योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत दिल्लीतील प्रत्येक महिलेला प्रति महिना १००० रुपये दिले जाणार आहेत. यासाठी सरकारने दोन हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. मात्र या योजनेसाठी काही अटी देखील आहेत. नेमकी ही योजना काय आहे आणि याचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार याबद्दल आपण जाणून घेऊया.

या योजनेचा लाभ १८ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना मिळणार आहे. तर या योजनेच्या लाभासाठी वयाची कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

दिल्लीच्या अर्थमंत्री आतिषी यांनी सांगितलं की या योजनेचा लाभ फक्त त्याच महिलांना मिळेल ज्या दिल्लीत मतदार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिल्लीतील पत्ता असलेलं मतदान कार्ड असणं बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या महिली दिल्लीत राहातात पण त्यांच्याकडे दिल्लीचा पत्ता असलेलं मतदान ओळखपत्र नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

जर तुमचे वय १८ वर्ष किंवा त्याहून अधिक असेल आणि तुम्ही दिल्लीतील मतदार आहात तर या योजनेचा लाभ घेऊ शकता.यासाठी आपल्याला एक फॉर्म भरावा लागेल. तसेच तुम्ही कुठल्याही दुसऱअया पेंशन स्कीमचा लाभ घेत नसल्याचे जाहीर करावे लागेल. सरकारी कर्मचारी आणि इनकम टॅक्सपेअर नसणे आवश्यक आहे. या फॉर्मसोबत प्रत्येक महिलेला आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, आणि बँक डिटेल्स द्यावे लागतील.

लाभ कोणाला मिळणार नाही?

अर्थमंत्री आतिशी यांनी स्पष्ट केलं की या योजनेचा लाभ त्या महिलांना मिळणार नाही ज्या करदाता आहेत. तसेच इतर कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत पेंशन घेत असलेल्या महिलांना देखील मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळणार नाहीत. तसेच सरकारी नोकरी करत असलेल्या महिलांना देखील या योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे.

योजना कधीपासून लागू होईल?

दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार याच वर्षी ही योजना सराकर लागू करेल. लोकसभा निवडणूकीनंर ही योजना अमलात आणली जाईल. म्हणजेच अगदी काही महिन्यात दिल्लीतील महिलांना दरमाह एक हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणे सुरू होईल. इतर सरकारी योजनेप्रमाणे यामध्ये देखील योजनेची रक्कम थेट महिलांच्या खात्यात वितरीत केली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Pune Metro Route : विमानतळ-कल्याणीनगर मेट्रोमार्ग निश्‍चित; सुरळीत वाहतुकीसाठी पौडफाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

SCROLL FOR NEXT