Delhi Murder Case esakal
देश

Delhi Murder Case: रक्त वाहून जावं यासाठी तिने दिवसभर मृतदेह घरात ठेवला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः श्रद्धा मर्डर केसप्रमाणेच आणखी एक धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. पत्नी आणि मुलाने मिळून पतीची हत्या केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर मृतदेहाचे दहा तुकडे करुन दिल्लीतील दोन भागांमध्ये फेकले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३० मे रोजी घडली. पोलिसांना ५ जून रोजी एका मृतदेहाचं शीर आणि काही अवयव सापडले होते. त्यानंतर पुढील तीन दिवसांमध्ये दोन पाय, दोन मांड्या, एक हात आणि कवटीचा भाग सापडला होता.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

या प्रकारानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुरुवातीला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, घरोघरी जावून चौकशी केली. परंतु काहीही माहिती मिळत नव्हती. अंजन दास नावाचा व्यक्ती मिसिंग असल्याची तक्रारही दाखल नव्हती. परंतु सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली. एक महिला आणि एक तरुण हातात बॅग घेऊन चालत होते. काही अंतराने ते जावून कचरा टाकल्यासारखं काहीतरी टाकत होते.

यावरुन पोलिसांना सुगावा लागला. अंजन दासची पत्नी पूनम आणि मुलगा दीपक याला ताब्यात घेण्यात आलं. त्यांनी खूनाची कबुली दिली. मात्र ज्या पद्धतीने दासचा खून करुन त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले, ते गंभीर होतं.

पूनमचं अंजनसोबत तिसरं लग्न

पोलिसांना आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पूनमचं लग्न १३ ते १४ वर्षांची असतांना झालेलं. तिचा पहिला पती तिला सोडून गेला. त्याला शोधत ती दिल्लीत आली. कल्लू नावाच्या माणसासोबत तिचं लग्न झालं. त्यांना तीन मुलं झाली. मात्र यकृत निकामी झाल्याने कल्लूचा मृत्यू झाला. पूनमचं दाससोबत २०१७मध्ये लग्न झालं. अंजन दासही विवाहित होता. पहिल्या पत्नीपासून त्याला तब्बल आठ मुलं आहेत.

...म्हणून अंजन दासचा काटा काढला

अंजन दास हा दीपकच्या पत्नीवर वाईट नजर ठेवून होता. शिवाय पत्नी पूनमच्या मुलीवरही त्याची वाईट नजर होती, असं आरोपींनी सांगितलं. त्यामुळेच दासचा काटा काढण्याचा प्लॅन मायलेकाने केला होता.

असा केला खून

अंजन दासचा खून करणं एवढं सोप्पं नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याची मान कापली. संपूर्ण रक्त वाहून जावे म्हणून त्यांनी तो मृतदेह घरात तसाच ठेवला. त्यानंतर त्याच्या शरीराचे १० तुकडे केले. ते फ्रिजमध्ये साठवले आणि संधी मिळताच कचरा फेकल्याचा बनाव करुन त्या तुकड्यांची विल्हेवाट लावली.

दरम्यान, काल आरोपी पूनमने पतीला मारल्याची कबुली दिली. तो मुलांवर वाईट नजर ठेवत होता, त्यामुळे त्याला मुलाने मारल्याचं पूनमने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT