Delhi Murder Case esakal
देश

Delhi Murder : आधी ७० हजार रुपयात पत्नीला घेतले विकत नंतर तिचाच केला खून !

Delhi Murder :

सकाळ डिजिटल टीम

Delhi Murder : दिल्लीमधून एक हृदयद्रावक हत्याकांड समोर आलं आहे.यावेळी आधी एका व्यक्तीने स्वतःसाठी 70 हजार रुपयात पत्नी खरेदी केली. त्यानंतर त्याच पत्नीचा खून करून गुन्हा लपवण्यासाठी पत्नीचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याची घटना घडली आहे.

या बाबत डीसीपी चौधरी यांनी माहिती दिली कि, शनिवारी पोलिसांना एक कॉल आला होता. फतेहपूर बेरी भागातील जंगलात एका महिलेचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलिसांना फोन वरून मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात पोलिसांनी त्या भागातून जाणारी वाहनांची माहिती घेतली तर दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास सुरू केला. प्राथमिक तपासात शनिवारी रात्री 1.40 च्या सुमारास एक ऑटो त्या भागातून गेल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी ऑटोचा तपास केला असता रिक्षाचा नोंदणी क्रमांक पोलिसांना सापडला. दिल्लीतील छतरपूर परिसरात राहणारा अरुण हा ऑटो चालवत असल्याचे तपासात समोर आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने माहिती द्यायला सुरुवात केली. अरुणने सांगितले की, मृत महिलेचे नाव स्वीटी आहे. ती धरमवीर नावाच्या व्यक्तीची पत्नी होती.

अरुणने पोलिसांना सांगितले की, त्याने त्याचा मेहुणा धरमवीर आणि सत्यवान यांना सोबत घेऊन स्वीटीची हत्या केली. दिल्ली-हरियाणा सीमेजवळील नांगलोई भागात या तिघांनी स्वीटीची गळा आवळून हत्या केली. नंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. अरुणने पुढे सांगितले की, त्याला या जंगलाची चांगली माहिती असल्याने मृतदेह लपवण्यासाठी या भागाची निवड करण्यात आली.

धरमवीर आपल्या पत्नीच्या वागण्यावर खूश नव्हता. स्वीटी अनेकदा काही महिने न सांगता तिच्या माहेरच्या घरी जात असे. वास्तविक, धरमवीरने स्वीटीला 70 हजार रुपये देऊन विकत घेतले होते, त्यामुळे तिच्या घरच्यांबद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. स्वीटी देखील तिच्या कुटुंबाबद्दल कधीच बोलत नव्हती. तिने फक्त बिहारमधील पटना येथील रहिवासी असल्याचे सांगितले होते.

या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येसोबतच पुरावे नष्ट केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे. खुनात वापरलेला ऑटोही पोलिसांच्या ताब्यात आहे. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी स्वीटीला रेल्वे स्टेशनवर सोडतो असे सांगून सोबत आणले होते. पोलीस आता त्या व्यक्तीचाही शोध घेत आहेत ज्यांच्याकडून धरमवीरने स्वीटीला विकत घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT