Delhi Murder Case esakal
देश

Murder Case : ATMमध्ये कॅश भरायला गेलेल्या गार्डवर गोळ्या झाडल्या; पैसे घेऊन मारेकरी पसार

संतोष कानडे

नवी दिल्लीः एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी गेलेली व्हॅन लुटण्याचा प्रकार दिल्लीमध्ये घडला आहे. या घटनेमध्ये एका गार्डची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

दिल्लीतल्या जगतपूर फ्लायओव्हरजवळ आयसीआयसीआय बँकेचं एटीएम आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी व्हॅन गेली होती.

याचवेळी काही गुंडांनी मागून येत कॅश व्हॅनच्या गार्डवर फायरिंग केलं आणि पैसे घेऊन फरार झाले. या गार्डला रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

हेही वाचाः योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

पोलिसांनी सांगितलं की, पाच वाजण्याच्या दरम्यान फायरिंग झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी पोहोचले. घडलेली घटना गंभीर असून पुढील तपास सुरु आहे.

दिल्लीमध्ये गुन्हेगारी वाढली

मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढलेल्या आहे. श्रद्धा मर्डर केसनंतर संपूर्ण देश हादरुन गेला. त्यानंतर मुलाने आणि आईने मिळून बापाची हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले होतं.

आता नुकतंच १ जानेवारी रोजी एका २० वर्षांच्या मुलीला कारखाली १३ किलोमीटर फरफट नेलं होतं. या घटनेमध्ये मुलीच्या दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या अंगावरचे कपडे फाटून गेले होते, शरीरावरील मांसही खरवडून गेलं होतं. त्यात पुन्हा आज कॅश व्हॅनच्या गार्डची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या झाल्याने दिल्लीत दहशत पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT