nuh clashes ANI
देश

Haryana Violence: हरियाणा हिंसाचाराची धग राजधानीत; बजरंग दल, VHP कडून दिल्ली-फरीदाबाद हायवे ब्लॉक

हरियाणाच्या नूह जिल्ह्यात सुरु झालेला हिंसाचार राज्यातील इतर जिल्ह्यातही पसरताना दिसत आहे. सोमवारपासून सुरु झालेला हिंसाचार बुधवारीही सुरु आहे

सकाळ डिजिटल टीम

Haryana Violence Spreads To Gurugram Areas

नवी दिल्ली- हरियाणाच्या नूह जिल्ह्यात सुरु झालेला हिंसाचार राज्यातील इतर जिल्ह्यातही पसरताना दिसत आहे. सोमवारपासून सुरु झालेला हिंसाचार बुधवारीही सुरु आहे. हरियाणाच्या गुरुग्रामसह इतर काही जिल्ह्यातून हिंसाचाराच्या बातम्या येत आहे. हरियाणातील अशांत परिस्थिती पाहता देशाची राजधानी दिल्लीमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

दिल्लीच्या अनेक भागात पोलिस आणि पॅरामिलिट्री तैनात करण्यात आली आहे. कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी ही तयारी केली जात आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी VHP दिल्ली-फरीदाबाद रस्ता बंद केल्याची माहिती आहे. बदरपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते नूह हिंसाचाराच्या विरोधात संपूर्ण देशात निदर्शने करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये एकूण 29 ठिकाणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद निदर्शने करण्याच्या तयारीत आहे. नूह आणि त्यानंतर हरियाणाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारा संदर्भात NIA कडून चौकशी व्हाही अशी मागणी केली जात आहे. गुरुग्राममध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचारात जमावाने एका मशिदीला आग लावली होती. ज्यात एका मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यातील वातावरण अधिक तापलं आहे.

दिल्लीपासून केवळ 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नूह जिल्ह्यात सोमवारी धार्मिक रॅलीदरम्यान हिंसाचार उफाळून आला होता. नूह चौकात आलेल्या रॅलीवर 12 ते 15 लोकांच्या जमावाने दगडफेक केली होती. तसेच परिसरातील गाड्यांना पेटवून दिले होते. त्यामुळे जवळपास 2500 लोकांनी नूह येथील मंदिरात आश्रय घेतला होता. पोलिसांच्या मदतीने तब्बल 5 तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या हिंसाचारात एकूण 4 लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश होता. तेव्हापासून हरियाणा राज्यात कलम 144 लागू करण्यात आला आहे. इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे. तसेच सरकारी आणि खाजगी कार्यालये, शाळा-महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. हिंसाचार आणखी वाढू नये यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT