ANI
देश

PM मोदींविरोधात पोस्टरबाजी,9 जणांना अटक

नामदेव कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याविरोधात कोरोना लसीकरण अभियानाबाबत आपत्तीजनक पोस्टरबाजी करणाऱ्या नऊ जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या पोस्टरबाजीविरोधात दिल्लीतील 10 पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 'मोदीजी, हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेज दी...' असे पोस्टर दिल्लीत विविध ठिकाणी लागल्यानंतर पोलिसंनी धडक कारवाई केली .

दिल्लीतील कल्याणपुरी येथून चार, ईशान्य दिल्लीतून दोन, उत्तर दिल्लीतून एक आणि द्वारकामध्ये दोन जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, आम आदमी पक्षाच्या धीरेंद्र कुमार या नगरसेवकाच्या सांगण्यावरुन आपण हे करत असल्याचं अटक करण्यात आलेल्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. पोस्टर लावणाऱ्या लोकांकडून जवळपास 800 ते 900 पोस्टर 20 मोठे बॅनर पोलिसांनी जप्त केले.

भारतीय युथ काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम कार्यालयात पोहोचली होती. कोविड-19 औषधांच्या अवैध वितरणाबाबत गुन्हे शाखेने त्यांची चौकशी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT