Supreme-Court sakal
देश

'वाईट चारित्र्य' घोषित करण्याच्या दिल्ली पोलिसांच्या निर्णयाला आव्हान; आप आमदाराच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

खानला 'वाईट चारित्र्य' घोषित करण्याच्या दिल्ली पोलिसांच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने 19 जानेवारी रोजी फेटाळून लावली होती.

Manoj Bhalerao

Supreme Court: ' वाईट चारित्र्य' घोषित करण्याच्या दिल्ली पोलिसांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर खान यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे, ज्यात त्यांनी पोलिसांच्या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे.

3 जुलै रोजी न्यायालयाने खान यांच्या याचिकेवर दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितले होते. खानला 'वाईट चारित्र्य' घोषित करण्याच्या दिल्ली पोलिसांच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने 19 जानेवारी रोजी फेटाळून लावली होती. दिल्ली पोलिसांनी ओखला येथील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार खान यांना गेल्या वर्षी 'वाईट चारित्र्य' म्हणून घोषित केले होते. खानच्या वकिलाने उच्च न्यायालयासमोर युक्तिवाद केला होता की अधिकाऱ्यांनी अत्यंत चूकीची कृती केली आहे.

खान यांच्या वकिलाने दावा केलाय की ज्या दस्ताऐवजात खान यांना हिस्ट्रीशीटर असा उल्लेख करण्यात आला आहे. ते कागदपत्र प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने त्यांच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांने सोशल मीडियावर शेअर केले होते.

खानला 'वाईट चारित्र्य' घोषित करण्याचा प्रस्ताव दक्षिणपूर्व जिल्ह्यातील जामिया नगर पोलिस स्टेशनने गेल्या वर्षी 28 मार्च रोजी पाठवला होता आणि 30 मार्च 2022 रोजी मंजूर करण्यात आला होता. खान यांच्या विरोधात एकूण 18 एफआयआर नोंदवण्यात आल्याचे कागदपत्रात म्हटले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT