Aiims delhi esakal
देश

AIIMS Crisis : दिल्लीतील एम्स रुग्णालयात सायबर हल्ला; दोघांना केले निलंबित

सकाळ डिजिटल टीम

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) दिल्लीचा सर्व्हर दोन दिवस उलटूनही सुरळीत झालेला नाही. सुरक्षेच्या कारणास्तव एम्सचा लॅन इंटरनेट सर्व्हरही गुरुवारी संध्याकाळी बंद करावा लागला. सध्या एम्स कॅम्पसमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा वापरली जात आहे. त्याचवेळी सायंकाळी उशिरा एम्स व्यवस्थापनाने संगणक शाखेशी संबंधित दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. एम्स व्यवस्थापनाने एका निवेदनात रॅन्समवेअर सायबर हल्ल्याची भीती व्यक्त केली होती परंतु सुरक्षा यंत्रणांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.(Delhi Police file FIR in AIIMS-Delhi ransomware attack )

एम्स नवी दिल्ली सर्व्हर हॅक प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सुमारे 11-12 तास सर्व्हर डाऊन झाल्यानंतर एम्सच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस तपास करत आहेत.

एम्समध्ये सर्व्हर बंद झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. देशाच्या सर्वोच्च एजन्सी ज्या प्रकारे तपासात सामील झाल्या आहेत, त्यावरून ही घटना देशाच्या सुरक्षेशी निगडीत असल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे.

तसेच, ऑनलाईन यंत्रणा बंद पडल्याने रुग्णांची देखभाल व्यवस्था विस्कळीत झाली असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. एम्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा मोठा सायबर हल्ला असल्याची शंका उपस्थित करत सरकारी पातळीवर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

सर्व्हरवर रॅन्समवेअर हल्ला

AIIMS ने एका निवेदनात म्हटले आहे की, AIIMS मध्ये काम करणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (NIC) टीमने माहिती दिली आहे की हा रॅन्समवेअर हल्ला असू शकतो. कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी याची चौकशी करतील. एम्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सर्व्हर बंद झाल्यामुळे स्मार्ट लॅब, बिलिंग, अहवाल तयार करणे आणि अपॉइंटमेंट सिस्टमसह ओपीडी आणि आयपीडी डिजिटल हॉस्पिटल सेवा प्रभावित झाल्या आहेत.”

डिजिटल सेवा पुनर्संचयित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) आणि NIC ची मदत घेतली जात आहे. तसंच, भविष्यात अशा घटना पुन्हा टाळण्यासाठी एम्स आणि एनआयसीकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT