Parliament Security Breach sakal
देश

Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा भेदणाऱ्या सहा आरोपींविरोधात एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल   

गतवर्षीच्या डिसेंबर ​महिन्यात संसदेची सुरक्षा भेदणाऱ्या सहा आरोपींविरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने पटियाला हाउस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

सकाळ वृत्तसेवा


नवी दिल्ली : गतवर्षीच्या डिसेंबर ​महिन्यात संसदेची सुरक्षा भेदणाऱ्या सहा आरोपींविरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने पटियाला हाउस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. डी. मनोरंजन, ललित झा, अमोल शिंदे, महेश कुमावत, सागर शर्मा आणि नीलम आझाद अशी या आरोपींची नावे आहेत.

13 डिसेंबर 2023 रोजी रोजी डी. मनोरंजन आणि सागर शर्मा यांनी प्रेक्षागृहातून लोकसभेत उडी मारत रंगीत धुराचे फवारे सोडले होते तर अमोल शिंदे आणि नीलम आझाद यांनी संसदेच्या बाहेर परिवहन भवनसमोर घोषणाबाजी केली होती. या दोघांना मदत करणाऱ्या महेश कुमावत आणि ललित झा यांना नंतर पोलिसांनी अटक केली होती. वरील आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेचे कलम 186 तसेच गैरकृत्य प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. आरोपींविरोधात दाखल करण्यात आलेले दोषारोपपत्र एक हजार पानांचे आहे.

अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती हरदीप कौर यांनी दोषारोप पत्राची दखल घेत पुढील सुनावणी 15 जुलै रोजी घेतली जाईल, असे सांगितले. कोठडीची मुदत संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सर्व आरोपींची कोठडी पुढील सुनावणीपर्यंत वाढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या क्षणी भाजपनं तिकीट कापलं, अमोल बालवडकर यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिंकून दाखवलं; मध्यरात्री लागला निकाल

Chaturgrahi Yoga: वर्षातील पहिला चतुर्ग्रही योग! वृषभ, तुळसह या ५ राशींचे चमकणार भाग्य; जाणून घ्या आजच राशीभविष्य

सोलापुरात विरोधकांना ना विरोधी पक्षनेता ना ‘स्वीकृत’ची संधी! उबाठा शिवसेनेसह ‘या’ ११ पक्षांचे सगळेच ३८० उमेदवार पराभूत, वाचा...

आजचे राशिभविष्य - 17 जानेवारी 2026

नात्यात अंतर

SCROLL FOR NEXT