देश

'The Wire' विरोधात गुन्हा दाखल; अमित मालवीयांकडून अब्रुनुकसानीचा दावा

मालवीय यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बनावट कागदपत्रांद्वारे आपली प्रतिमा मलिन केल्याचा दावा करत भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 'दि वायर' या मीडिया कंपनीविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार, दिल्ली पोलिसांनी या कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मालवीय यांनी 'द वायर' विरोधात फौजदारी आणि दिवाणी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. (Delhi Police register FIR against the Wire over Amit Malviya complaint)

'द वायर'चे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन, संस्थापक-संपादक सिद्धार्थ भाटिया, एमके वेणू आणि उपसंपादक तसेच कार्यकारी वृत्त निर्मात्या जान्हवी सेन यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर कलम 420, 468, 469, 471, 500 तसेच भादंवि १२० बी आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मालयवीय यांनी म्हटलं की, "मी 'द वायर' विरोधात केवळ फौजदारी प्रक्रिया सुरू करणार नाही तर त्यांच्यावर दिवाणी न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावाही करणार आहे. कारण त्यांनी माझी प्रतिष्ठा खराब आणि कलंकित करण्याच्या हेतूनं बनावट कागदपत्रे तयार केली आहेत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आता स्टेजवर ब्लाऊजची बटणं काढली जातायेत" वाढत्या डीजे शोबाबत मेघा घाडगेंचा खळबळजनक खुलासा

Instagram Teleprompter Feature: आता Reels बनवणं होणार अगदी सोपं! Instagramचं नवं फीचर चर्चेत; 'असं' वापरलं तर झटपट वाढतील फॉलोवर्स

मनिषा हवालदारने शाळेतूनच काढल्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या प्रिंट आउट; NEET-UG २०२६ पेपरफुटी प्रकरणात नवा खुलासा!

११ कोटी कमावणाऱ्या 'देऊळबंद २'चं बजेट किती आहे माहितीये? ३ दिवसात वसूल केले बजेट?

Latest Marathi News Live Update : महागाईच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबारमध्ये आंदोलन; राज्यभरात राजकीय वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT