delhi police says ex jammu kashmir governor satya pal malik not detained sakal
देश

Satya Pal Malik : सत्यपाल मलिक यांच्या अटकेची अफवा

स्वत: पोलिस ठाण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या अटकेच्या बातम्यांवरून आज चांगलाच गोंधळ उडाला. मलिक यांच्यासमवेत होणाऱ्या खाप नेत्यांच्या बैठकीला नाकारलेली परवानगी आणि या बैठकीसाठी एकत्र आलेल्या जमावाला पांगविण्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई, यामुळे अफवांचे पेव फुटल्यानंतर मलिक यांना ताब्यात घेतल्याचा अथवा अटक झाली नसल्याचा खुलासा दिल्ली पोलिसांना करावा लागला.

पुलवामा दहशतवादी हल्ला निष्काळजीपणे झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला मौन राहण्यास सांगितले होते, अशी पंतप्रधानांना लक्ष्य करणारी खळबळजनक मुलाखत दिल्यानंतर माजी राज्यपाल सत्यपाल मलिक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.

तर, काश्मीरमधील प्रकल्पांच्या परवानगीप्रकरणी ३०० कोटी रुपयांची लाच देऊ केल्याच्या मलिक यांच्या आरोपांनंतर सीबीआयद्वारे तपास सुरू असून पुढील आठवड्यात सीबीआय त्यांची चौकशी करणार असल्याच्याही बातम्या झळकल्या आहेत.

यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही झडले असून सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारविरुद्ध संघर्षाची घोषणाही केली आहे. या पार्श्वभूमीवर आज सत्यपाल मलिक यांच्या भेटीसाठी पंजाब, हरियाना, पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी नेते दिल्लीच्या आर. के. पुरम भागामध्ये आले होते. ही खाप नेत्यांची बैठक असल्याचेही सांगण्यात आले.

या बैठकीसाठी मंडप उभारण्यात आला होता आणि जमा होणाऱ्या नेते, समर्थकांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात येत होती. मात्र, या भागामध्ये निदर्शने, मेळावा यासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याचे कारण देत दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. याला विरोध करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.

या कारवाईमुळे नाराज झालेले माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आर. के. पूरम पोलिस ठाण्यात जाऊन विरोध व्यक्त केला. त्यामुळे मलिक यांना अटक झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झाल्या होत्या. वातावरण तापल्याने पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला. एवढेच नव्हे तर सत्यपाल मलिक यांना अटकही झालेली नाही आणि ताब्यातही घेतलेले नाही.

मलिक स्वतः पोलिस ठाण्यात आले, असे पोलिस उपायुक्तांनी (नैर्ऋत्य दिल्ली) स्पष्ट केले. आर. के. पुरम सेक्टर ९ या भागातील उद्यानामध्ये निदर्शने, मेळाव्याची परवानगी नसताना काही जण तेथे बैठकीसाठी एकत्र आले होते. या समुहाच्या बैठकीला परवानगी नाकारल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. दुपारी उशिरा सत्यपाल मलिक समर्थकांसह घरी परत गेल्याचेही पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT