Delhi-Gurugram-Expressway
Delhi-Gurugram-Expressway 
देश

दिल्ली गारठली; काश्‍मीर खोऱ्यात हिमवृष्टी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह एनसीआर परिसराला यंदाच्या हिवाळ्यातील थंडीने पहिला दणका दिला आहे. बुधवारी पहाटे ५ अंश सेल्सिअसच्या आसपास पारा घसरल्याने दिल्लीकर गारठून गेले होते. थंडीच्या जोडीला धुक्‍याचेही साम्राज्य असल्याने दृश्‍यमानतेचे प्रमाणही अत्यंत कमी होते. आठवडाभर दिल्लीचा पारा ४ अंश सेल्सिअस व त्यापेक्षाही जास्त घसरू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकीकडे पेटलेले शेतकरी आंदोलन व त्याचे कारण दाखवून दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेल्या अडथळ्यांमुळे होणाऱ्या महा-वाहतूक कोंडीने वैतागलेल्या दिल्लीकरांना आता कडाक्याच्या थंडीचा देखील सामना करावा लागणार आहे. यंदा मार्गशीर्षाच्या नमनालाच थंडीने दिल्लीला पहिला तडाखा दिला. दिल्लीत काल (मंगळवारी) ४.१ अंश किमान तापमानाची नोंद झाली. केंद्रशासित जम्मू-काश्‍मीरसह हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. काल ४.१ अंश सेल्सिअसवर असणारे किमान तापमान आज सकाळी नऊनंतर किंचित वाढून ५.८ वर गेले मात्र झोंबणाऱ्या गार वाऱ्यांमुळे दिवसभर दिल्लीत थंडीचेच साम्राज्य राहिले त्यात प्रदूषणाची भर पडल्याने वातावरणात नकोसा कुंदपणा दिवसभर रेंगाळत होता. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उत्तरभारतात थंडीची लाट 
उत्तर भारतातही अनेक राज्यांत थंडीची लाट आली आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुराबरोबरच छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आदी राज्यांत कडाक्‍याची थंडी, दाट धुके किंवा ढगाळ वातावरणाचा प्रभाव जाणवत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवणार…?' दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर नेटकऱ्यांनी घेतली मजा

The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

SCROLL FOR NEXT