The Indian government declared the Red Fort bomb blast an “Act of War,” signaling a strong and uncompromising stand against terrorism in the nation’s capital.

 

esakal

देश

Modi Government on Delhi Bomb Blast : दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोटावर मोदी सरकार कडक भूमिकेत ; ‘Act of War’ मानत भयानक दहशतवाद हल्ला ठरवलं!

Modi Government declares Red Fort bomb blast an act of war : पंतप्रधान मोदींनी घेतली CCS बैठक ; दहशतवाद्यांचं सिंडिकेट उध्वस्त करण्याचा केला निर्धार

Mayur Ratnaparkhe

PM Modi CCS Meeting News : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(बुधवार) नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची संरक्षण विषयक समितीची(सीसीएस) बैठक घेतली. प्राप्त माहितीनुसार, या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांचं सिंडेकट उध्वस्त करण्याचा प्रण घेतला.

तर सीसीएस बैठकीनंतर कॅबिनेट बैठकही पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीत दिल्ली स्फोटाला एक जघन्य दहशतवादी घटना ठरवलं गेलं आणि या हल्ल्याचा तीव्र निषेधही व्यक्त केला गेला. यावेळी पंतप्रधानांसह कॅबिनेटने दोन मिनिटं मौन बाळगून स्फोटात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मोदी सरकारने दिल्लीतील बॉम्बस्फोटास एक भयानक दहशतवादी घटना म्हणून संबोधलं आहे. सरकारने म्हटलं आहे की दहशतवादी आणि त्यांचे सूत्रधार लवकरच ओळखले जातील. दहशतवादी आणि त्यांच्या सूत्रधारांना सोडले जाणार नाही. सरकारने दिल्ली हल्ला हा Act of War मानला आहे.

सीसीएस बैठकीनंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाल किल्ला बॉम्बस्फोट अन् दहशतवाद्यांचा बिमोड करण्याबाबत चर्चा झाली. तसेच, सरकारने या स्फोटाला जबाबदार असणारे दहशतवादी आणि त्यांच्या सूत्रधारांची लवकर ओळख पटवण्याचे निर्देश दिले, असून  हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असे सांगितले आहे.

याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहशतवादाबाबत सरकारच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणाचाही पुनरूच्चार केला गेला आणि त्यादृष्टीने दहशतवाद्यांवर कारवाई केली जाईल, असे ठरवले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: विजय आपलाच, पण त्याच्यापासून सावध राहा..., हरभजन सिंगचा भारतीय संघाला इशारा

Railway News: सामान्य डब्यांनाही एसीसारखी स्वच्छता असणार! भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ट्रेन प्रवासात ऐतिहासिक बदलाची नांदी

Mumbai News: अतिक्रमण काढण्यास महापालिका अपयशी, उच्च न्यायालयाचे ताशेरे; महापालिका आयुक्तांना आदेश

14,50,00,000 रुपये ! अभिषेक बच्चनची लक्झरी अपार्टमेंट विकून बक्कळ कमाई ; सिनेमे अपयशी पण बिझनेसमध्ये यश

Latest Marathi News Live Update : गोंदियात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT