Shraddha Murder Case sakal
देश

Shraddha Murder Case: नार्को टेस्टमध्ये आफताबला विचारले 'हे' प्रश्न; 'त्या' सहा महिन्यांमध्ये नेमकं काय घडलं?

सकाळ डिजिटल टीम

Aftab Poonawalla narco test questions

नवी दिल्लीः श्रद्धा खून प्रकरणाध्ये आज आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट करण्यात आली. या दरम्यान आफताबला महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. श्रद्धाचा खून केल्यानंतरच्या सहा महिन्यांमध्ये नेमकं काय झालं? असा प्रश्न आफतबला यावेळी विचारण्यात आला.

आफताबला विचारलेले काही प्रश्न

१. श्रद्धाचा खून कोणत्या तारखेला केला?

२. श्रध्दाला का मारलं?

३. श्रद्धाला कसं मारलं?

४. मृतदेहाचे तुकडे कसे केले?

५. तुकडे करण्यासाठी हत्यार कुठून घेतले?

६. तुकड्यांना घरामध्ये किती काळ ठेवलं?

७. तुकड्यांना कसं आणि कुठं ठेवलं?

८. मृतदेहाच्या तुकड्यांची कुठे-कुठे विल्हेवाट लावली?

९. हत्यार कुठे फेकले?

१०. हत्येनंतर सहा महिने काय केलं?

११. रागाच्या भरामध्ये खून केला तर पोलिसांपुढे सरेंडर का नाही केलं?

हे ही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

दिल्लीतल्या भीमराव आंबेडकर रुग्णालयामध्ये आज आफताब पूनावालाची नार्को टेस्ट झाली. यावेळी या प्रकरणाशी संबंधित अधिकारी, तज्ज्ञ यांची टीम उपस्थित होती. तब्बल दोन तास ही टेस्ट सुरु होती. आफताबने जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं दिल्याची माहिती आहे.

इंग्रजीमध्ये दिली उत्तरं

नार्को टेस्टदरम्यान आफताबने अनेक प्रश्नांची उत्तरं इग्रजी भाषेमध्ये दिली आहेत. काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्याने वेळ घेतला तर काही प्रश्नांची उत्तरं त्याने दिली नाहीत. मात्र त्याला वारंवार तेच प्रश्न विचारल्याने त्याने उत्तरं दिली. नार्को टेस्टनंतर पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाल्याचं सांगितलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT