Supreme Court sakal
देश

Delhi Water Crisis : टँकर माफियांना आवरा अन्यथा...; सर्वोच्च न्यायालयाचे दिल्ली सरकारला निर्देष

Delhi water crisis : पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोणते उपाय केले जात आहेत, अशी विचारणा न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी केली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘टँकर माफियांना आवरा अन्यथा पोलिसांना कारवाई करावयास सांगू,’’ असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिला आहे. मागील काही दिवसांपासून देशाच्या राजधानीत पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. दिल्लीच्या शेजारील राज्यांना राजधानीसाठी जास्त पाणी सोडण्याचे ​निर्देश न्यायालयाने देऊनही येथील पाणी टंचाई संपलेली नाही.

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोणते उपाय केले जात आहेत, अशी विचारणा न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी केली. पाण्याअभावी लोकांचे जे हाल होत आहेत ते आम्ही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पाहात आहोत. अशा स्थितीत कोणकोणते उपाय योजले जात आहेत, याची माहिती प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सादर करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. दिल्लीच्या वाट्याचे पाणी हरियाना सोडत नसल्याचा आरोप पंधरवड्यापूर्वी ‘आप’ सरकारमधील मंत्री आतिशी यांनी केला होता. दुसरीकडे हरियाना तसेच हिमाचल प्रदेश या राज्यांनी जास्त पाणी सोडावे, असे ​आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

Shriram Rajurkar Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे निधन; नांदेडच्या ग्रामीण राजकारणातील एक संयमी, विकासाभिमुख नेतृत्व हरपले

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

SCROLL FOR NEXT