Bulli Bai Case google
देश

'भयंकर', BulliBai वरून महिला आयोगानं दिल्ली पोलिसांना सुनावलं

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बुल्ली बाई नावाच्या अॅपचा (Bulli Bai Case) वापर करून मुस्लीम महिलांना टार्गेट केले जात आहे. तसेच त्यांच्या फोटोचा लिलाव केला जात आहे. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने (Delhi Women Commission) स्वतः दखल घेतली असून दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला (Cyber Crime Branch Delhi Police) समन्स बजावला असून गुन्हेगारांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

मुस्लीम महिलांचे सोशल मीडियावरून फोटो चोरून त्यांना ट्रोल केले जाते. त्यानंतर त्याच महिल्यांच्या फोटोंचा बुल्ली बाई नावाने लिलाव केला जातो. यामध्ये काही पत्रकार महिलांचा देखील समावेश आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कारवाईची मागणी केली आहे. तसेच त्यांनी या आरोपींना अटक करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे. त्यानंतर हे अकाऊंट बंद करण्यात आल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांना सुनावलं -

बुल्ली बाई प्रमाणेच जुलै २०२१ मध्ये सुल्ली डिल्स नावाने मुस्लीम महिलांना टार्गेट केलं जातं होतं. सुल्ली डिल्स नावाने त्यांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. त्यावेळी देखील दिल्ली महिला आयोगानं हस्तक्षेप करत तक्रार दाखल केली होती. पण, अद्यापही दिल्ली पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही. त्याबाबत आयोगाने नाराजी व्यक्त केली असून प्रकरण इतकं गंभीर असताना दोषींना अटक न करणे हे भयंकर आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या उदासीन वृत्तीमुळे महिला आणि मुलींची ऑनलाइन विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळत आहे, असा आरोप करत आयोगाने पोलिसांना सुनावले आहे.

दरम्यान, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला असून गृहमंत्र्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच बुल्ली बाई आणि सुल्ली डिल्स हे दोन्ही प्रकरणे हे केंद्र सरकारच्या पाठिंब्यानं सुरू आहेत, असा आरोप देखील मलिकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT