Delhi Acid Women commission Sakal
देश

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी टाकली धाड; सार्वजनिक शौचालयातला धक्कादायक प्रकार उघड

घडल्या प्रकारानंतर त्यांनी संबंधितांवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.

वैष्णवी कारंजकर

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल या महिलांच्या प्रश्नांवर आहेत. त्यांनी दर्यागंज भागातील एका शौचालयाची अचानक तपासणी केली असता तिथं ५० लिटर अॅसिड आढळलं. त्यांनी स्वत: त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

त्यांनी सांगितलं की, दिल्लीत उघड्यावर पडलेलं इतकं अॅसिड अनेकांचा जीव घेऊ शकते. मालीवाल यांनी गुरुवारी त्यांच्या टीमसोबत स्वच्छतागृहाची पाहणी केली असता तिथं अस्वच्छतेचा ढीग आढळून आला. तिथंच त्यांना उघड्यावर ठेवलेले 50 लिटर अॅसिड सापडले.

नंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं, अॅसिड जप्त केलं आणि या प्रकरणावर महापालिकेकडून उत्तर मिळेल असं सांगितलं. यासोबतच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. देशभरात अॅसिड हल्ल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळेच ते उघड्यावर मिळणे ही चिंतेची बाब आहे.

याआधी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी संजय कॉलनी झोपडपट्टीतील टॉयलेटची अचानक पाहणी केली होती, तिथे अस्वच्छता पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले आणि ते तातडीने स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे, ५ एप्रिल रोजी दिल्लीतील खिचडीपूरमध्ये शौचालयाची तपासणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख आणि श्रीकांत ठाकरे ही राम-लक्ष्मणाची जोडी, उद्धव ठाकरे; संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT