delhi youth chat with lady constable 
देश

गर्लफ्रेण्ड समजून महिला पोलिसाशी केले चॅटींग अऩ्...

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः गर्लफ्रेण्ड एकाने महिला पोलिसासोबत चॅटींग केले. चॅटींग दरम्यान प्रेमाच्या गुजगोष्टी करण्यात आल्या. एका अज्ञातस्थळी भेटायला बोलवल्यावर तो आनंदाने गेला. पण, घटनास्थळी गेल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुंडका भागामध्ये एक मोटार लुटण्यात आली होती. यामधील संशयीत आरोपी सोमवीर बाबत माहिती मिळाली होती. त्याचे कॉल रेकॉर्डस तपासण्यात आल्यानंतर तो एका मुलीशी तासन तास बोलत असल्याचे दिसून आले. यामुळे महिला पोलिसांनी त्याच्या प्रेयसीचे घर गाठले. तिला विश्वासात घेऊन तिचा मोबाईल ताब्यात घेतला. महिला पोलिसाने त्याच्याशी व्हॉट्सऍपवरून चॅटिंग सुरू केले. काही तास एकमेकांशी चॅटिंगवरून बोलणे सुरू होते. सोमवीर आपली मैत्रिण समजून बोलत होता. महिला पोलिसाने त्याच्याकडून माहिती काढून घेत त्याला एका अज्ञात ठिकाणी भेटायला बोलवले. सोमवीर घटनास्थळी आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, सोमवीरला ताब्यात घेतल्यानंतर त्याने मोटार लुटल्याची कबुली दिली. महिला पोलिसाने लढविलेल्या शक्कलीमुळे सोमवीरला पकडण्यात यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: पुन्हा चर्चा मेलोडीची! मोदींनी मेलोनी यांना दिलं स्पेशल गिफ्ट, व्हिडिओ बनवत म्हणाल्या...

Andekar Gang: कशी सुरू झाली आंदेकर टोळीची दहशत? भांड्याचा व्यवसाय ते अंडरवर्ल्ड कनेक्शन! पुण्यात तिसरी हत्या... ४ पिढ्यांचा इतिहास

जंजिरा, सिंधुदुर्ग २६ मे पासून बंद; वॉटर स्पोर्टही बंद ठेवण्याचे आदेश!

Ghaziabad Accused Bail Celebration : जामिनावर सुटलेल्या बलात्काराच्या आरोपीवर उधळली फुले, जल्लोषात काढली मिरवणूक; संतापजनक प्रकार

Income Tax Officer Success Story: आधी ना 'इन्कम' होती ना 'टॅक्स'; रीलस्टार तरुण बनला थेट इन्कम टॅक्स ऑफिसर; पाहा ९ वर्षांच्या संघर्षाची रंजक गोष्ट!

SCROLL FOR NEXT