who chief Tedros Adhanom Ghebreyesus Sakal Media
देश

....तर कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट अनर्थ घडवेल - WHO

कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा जगभरात प्रसार वाढत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा जगभरात प्रसार वाढत आहे. त्यामुळे जर विविध देशांमध्ये कोरोना संदर्भातील निर्बंध उठवण्यात घाई करण्यात आली तर त्याचे गंभीर परिणाम होतील. ज्याचं लशीकरण झालेलं नाही त्यांच्यावर यामुळे अनर्थ ओढवेल, असा गंभीर इशारा जागतीक आरोग्य संघटनेचे (WHO) सरचिटणीस टेड्रोस घेब्रेसेस यांनी दिला आहे. (delta varient lifting restrictions too quickly disastrous for those not vaccinated WHO)

घेब्रेसेस म्हणाले, "आपण सध्या साथीच्या आजाराची महामारी अनुभवत आहोत. जगातील अनेक देश अद्यापही खूपच धोकायदायक परिस्थितीतून जात आहेत. तर ज्या देशांमध्ये सर्वाधिक लशीकरण झालेलं आहे. ते देश आता निर्बंध हटवण्याबाबत बोलत आहेत. पण अशा देशांना या डेल्टा व्हेरियंटपासून सावध रहावं लागेल"

डेल्टा व्हेरियंट ५० पट जास्त संसर्गजन्य

डेल्टा व्हेरियंट (B.1.617) पहिल्यांदा युकेमधील केंट रिजनमध्ये आढळून आला होता. त्यानंतर त्याचा अनेक देशांमध्ये फैलाव झाला आहे. भारतातही हा अतिवेगानं व्हेरियंट दाखल झाला असून पंजाबमध्ये आढळून आला आहे. कोरोनाच्या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या अल्फा व्हेरियंटला (B.1.1.7) मागे टाकू शकतो. डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गात केवळ एका महिन्यात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अल्फा व्हेरियंटपेक्षा डेल्टा व्हेरियंट ५० पट जास्त संसर्गजन्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT