Ramdas Athawale Sakal
देश

नवबौध्दांना आरक्षणाचे लाभ द्या - आठवले

बौध्द नागरिकांचा समावेश आरक्षित वर्गाच्या सूचीमध्ये करण्याची मागणी

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - बौध्द धम्माचा स्वीकार करणारे अनुसूचीत जातींमधील लाखो बांधव आरक्षणाचे लाभ मिळण्यापासून वंचित आहेत. या बौध्द नागरिकांचा समावेश आरक्षित वर्गाच्या सूचीमध्ये करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.

आठवले यांनी देशविदेशातील बौध्द संघटनांच्या प्रतीनिधींसह राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. भिख्खु संघटनेचे डॉ. राहुल बोधी महाथेरो, भदंत प्रज्ञानंद, विजयराजे धमाल आदी उपस्थित होते. येत्या आॅक्टोबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या जागतिक बौध्द संमेलनाचे आमंत्रणही राष्ट्रपती कोविंद याना देण्यात आले. ते त्यांनी स्वीकारल्याचे आठवले यांनी सांगितले. अखिल भारतीय भिख्खु संघटनेतर्फे देशातील भिख्खुंसाठी सुविधा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या भेटीवेळी आठवले यांनी देशाच्या सर्वोच्च स्थानी दलित समाजाचे प्रतीनिधीत्व करणारे कोविंद यांच्या कार्याबद्दल विशेष आभार मानले.

अनुसूचित जातीमधून बौद्ध धर्मात सामील होणाऱ्या बांधवांना आरक्षणाच्या लाभांपासून वंचित ठेवले जाते. ते अधिकार त्यांना मिळायला हवेत असे ते म्हणाले. महाराष्ट्रात असे सुमारे २ कोटी बौध्द बांधव आहेत. याशिवाय देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १६ टक्के असलेल्या दलित वर्गातील इतर राज्यांतील नागरिकांनीही बैध्द धम्माचा स्वीकार केला आहे त्यांनाही अद्याप आरक्षणाचे लाभ मिळत नसल्याचे आठवले यांनी राष्ट्रपतीना सांगितले. दरम्यान यावेळी पर्यावरणातील बदलांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची केली पाहणी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT