Demonetisation 
देश

Demonetisation: "नोटबंदी हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग;" सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं मत

मोदी सरकारनं केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती नागरत्न यांनी एक खळबळजनक भाष्य केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मोदी सरकारनं केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती नागरत्न यांनी एक खळबळजनक भाष्य केलं आहे. नोटाबंदी हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळं आता वेगळीच चर्चा सुरु आहे. (Demonetisation was a good way of converting black money into white money says Justice BV Nagarathna)

एका खटल्यावर सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नागरत्न यांनी म्हटलं की, नोटाबंदीच्या आदल्यादिवशी नव्या चलनाची चर्चा सुरु झाली आणि दुसऱ्या दिवशी नोटाबंदी झाली. जर भारताला कागदी चलनाकडून प्लॅस्टिक मनीकडं जायचं होतं तर त्यासाठी निश्चितच नोटाबंदी हा पर्याय नव्हता. (Marathi Tajya Batmya)

त्यामुळं ज्या पद्धतीनं नोटाबंदी करण्यात आली ते योग्य नव्हतं. ही कायदेशीर निर्णय प्रक्रिया नव्हती. ज्या घाईमध्ये हे केलं गेलं ते योग्य नव्हतं. कारण काही लोक म्हणतात की तत्कालीन अर्थमंत्र्यांनाही या निर्णयाची माहिती नव्हती. (Latest Marathi News)

त्यामुळं काळ्या पैशाचं पांढऱ्या पैशात रूपांतर करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, असं मला वाटतं. त्यानंतर इन्कम टॅक्स विभागाच्या कार्यवाहीचं काय झालं, आम्हाला माहिती नाही. त्यामुळं, सामान्य माणसाला झालेल्या त्रासामुळं मला खऱ्या अर्थानं अस्वस्थ वाटलं आणि म्हणून मी विवेक नारायण शर्मा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात असहमती दर्शवली अशी भूमिकाही यावेळी न्या. नागरत्न यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT