Crime News Esakal
देश

Crime News: २०० रूपयांची उधार परत केली नाही म्हणून.. दाजीने मेहुण्याची चिकन कापण्याच्या सुरीने केली हत्या

Crime News: देवरियामध्ये उधार घेतलेले 200 रुपये परत न केल्याने कोंबडा कापण्याच्या चाकूने मेहुण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा झालेल्या या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उधार घेतलेले 200 रुपये परत न केल्याने उत्तर प्रदेशातील देवरिया येथे मेव्हण्याने कोंबडा कापण्याच्या चाकूने वार करून आपल्या मेव्हण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा झालेल्या या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आरोपीला अटक केली. मृताच्या घरात एकच गोंधळ उडाला.

बाघौचघाट पोलीस स्टेशन हद्दीतील बजरहान गावात राहणारा झाकीर अन्सारी (३२) याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. झाकीरची बहीण जुबेन हिचा विवाह रामपूर येथील नियामतशी झाला होता. मृत झाकीर याचे बजरहान गावाजवळील बुधन चौकात चिकनचे दुकान होते. नातेसंबंधामुळे मयत झाकीरने त्याचे दुकान त्याच्या मेव्हण्याचा लहान भाऊ मुनीब याला दिले होते.

तीन दिवसांपूर्वी झाकीरने मुनीबकडून 200 रुपये उसने घेतले होते. झाकीर गेल्या गुरुवारी संध्याकाळी चिकनच्या दुकानात गेला होता. यादरम्यान मुनीबने दोनशे रुपये परत मागायला सुरुवात केली. त्यावर झाकीरने त्याचे दुकान परत करण्याबाबत बोलणे सुरू केले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर हाणामारी झाली. दरम्यान, मुनीबने चिकन कापण्याच्या शस्त्राने झाकीरच्या पोटात वार केले.

या घटनेने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमी झाकीरला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. झाकीर पुढच्या महिन्यात (एप्रिल) लग्न करणार होता. दोघांच्याही घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती, मात्र आता झाकीरच्या हत्येनंतर दोन्ही कुंटूबांवर शोककळा पसरली आहे.

मृत झाकीर हा तीन भावांमध्ये दुसरा होता. वडील मोलमजुरी करतात.याप्रकरणी बाघौचघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी मृत्युंजय राय यांनी सांगितले की, आधी २०० रुपयांवरून वाद झाला, नंतर मारामारी झाली. त्यानंतर मुनीबने झाकीरची हत्या केली. आरोपी मुनीब याला अटक करण्यात आली आहे. याशिवाय हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT