Bihar news  
देश

नोकरीसाठी आक्रमक तरुण थेट पोहोचला मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठाजवळ; CMच्या सुरक्षेत मोठी चूक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - बिहारमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाचे मोठे प्रकरण समोर आले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गांधी मैदानावर स्वातंत्र्यदिनी संबोधित करत होते, त्यादरम्यान एक युवक व्यासपीठाजवळ घुसला आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात निदर्शने करत घोषणाबाजी करू लागला.

तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले. यावेळी तरुणाने घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पटनाचे जिल्हा दंडाधिकारी डॉ. चंद्रशेखर यांनी घटनेबाबत सांगितले की, तो मुंगेरचा रहिवासी आहे. नितीश कुमार असे या तरुणाचे नाव असून त्याच्या हातात पदक होते. राजेश्वर मंडल असे तरुणाच्या वडिलांचे नाव आहे.

युवकाच्या वडिलाचे 1996च्या निवडणुकीदरम्यान कर्तव्यावर असताना निधन झाले होते. ते बीएमपीचे शिपाई होते. त्यांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरीबाब या तरुणाने मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने केली. या घटनेची माहिती बिहार पोलिस मुख्यालयाला देण्यात आली आहे. तसेच घटनेचा तपास करण्यात येत आहे. युवक व्हीआयपींच्या रांगेत कसा पोहोचला, याची देखील चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT